हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई येथे राज्यातील वाहतूक विभागाच्या प्रमुख अधिकारयांची बैठक घेऊन राज्यातील महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत सूचना दिल्या. त्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी भेटी दिल्या. कराड तालुक्यातील इंदोली येथे आल्यानंतर महामार्ग पोलीसांना त्यांनी सूचना केल्या. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. वाहतुकीचे नियम तोडणारांची गय करू नका असेही आदेश दिले.
यावेळी शंभूराज देसाई म्हणाले, हायवे ट्राफिक वरती जे अपघाताचे प्रमाण वाढत आहे किंवा अपघात होणाऱ्या संख्येत वाढ होत आहे ते नियंत्रणात आणण्यासाठी वाहतुकीला शिस्त लागावी यांच्याकरिता 14 तारखेला सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई मध्ये बैठक घेतली होती.आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आपण ही शिस्त कशी लावू शकतो या अनुषंगाने काही आदेश येण्याची ट्राफिक कडून आपण संपूर्ण राज्यातील आणि तिथल्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.
आज प्रत्यक्ष या मोहिमेची सुरुवात या मुंबई – बेंगलोर हायवे वर केलेली आहे. याची पुर्व तयारी काय केली याचा आढावा देखील घेतला आहे. आज ही मोहीम सुरू झाली आहे. आमचे सर्व अधिकारी देखील फिल्ड वरती आहेत. विशेषतः हायवे वर लेन सोडून जड वाहने यांनी डाव्या बाजूने चालले पाहिजे.हा नियम आहे परंतु बहुतांशी वाहनचालक उजव्या बाजुने वाहन चालवुन वाहतुकीला अडथळा आणून अपघाताला कारणीभूत ठरतात.
बाकी चारचाकी वाहने देखील जेवढी स्पीड मर्यादा आहे त्याच्या पेक्षा जास्त जलद गाडी चालवतात म्हणून आपण मुंबई बेंगलोर हायवेवर ही मोहीम राबवतोय त्यामुळं अशाप्रकारे जे नियमांचं उल्लंघन करून जे गाडी चालवतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोणाला नाहक त्रास देण्यासाठी ही मोहीम नाही पण जे काही सर्वसामान्य वाहन चालक आहेत जे सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करून आपलं वाहन चालवतात अशा लोकांना आशा बेजबाबदार लोकांमुळे त्रास होतो. शेवटी वाहनातुन प्रवास करणाऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे. आणि अपघाताच हे प्रमाण कमी करण्यासाठीच ही मोहीम आहे. त्यामुळे मी आवाहन करतो की वाहन चालकानी नियमांचं काटेकोरपणे पालन करून वाहन चालवावे
खूप वेळा दंड करून देखील जर वाहन चालकाची सवय मोडत नसेल किंवा जाणीवपूर्वक तो मुद्दाम तस करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नियमातील तरतूदी नुसार त्याच लायसन सस्पेंड केलं जाईल असा इशारा देखील शंभूराज देसाई यांनी दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’