‘या’ कारणांमुळे नाकारला जाऊ शकतो Life Insurance क्लेम !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Life Insurance : सध्याच्या काळात इन्शुरन्सचे महत्व खूप वाढले आहे. लाइफ इन्शुरन्स असो किंवा हेल्थ इन्शुरन्स बाबतची जागरूकता आता चांगलीच वाढली आहे. ज्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांकडून इन्शुरन्स पॉलिसी घेतली जाते आहे. मात्र कोणताही इन्शुरन्स घेण्याआधी त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण यामुळे क्लेम करण्यास कोणताही त्रास होणार नाही.

Beat the Pandemic - Secure the future of your loved ones with life insurance

Life Insurance क्लेम फेटाळला गेला तर खूप दुःख होते. अशातच जर लाइफ इन्शुरन्स घेणारी व्यक्ती घरातील एकमेव कमावती असेल आणि त्याच्या मृत्यूनंतर लाइफ इन्शुरन्स क्लेम नाकारला गेला तर कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पॉलिसीधारकांनी कोणत्या परिस्थितीत क्लेम नाकारला जाईल याची माहिती घेतली पाहिजे.

The Importance of Life Insurance - Moore Resources Insurance

चुकीची माहिती

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर विमाधारकाने Life Insurance घेताना कोणतीही चुकीची माहिती दिली असेल, तर क्लेम नाकारला जाण्याची शक्यता वाढते. विमाधारकाने पॉलिसी घेताना आरोग्य, वय, वजन, उंची किंवा उत्पन्न याबाबतची चुकीची माहिती दिल्यास क्लेम नाकारला जाऊ शकतो.

Who Needs Life Insurance Coverage In Malaysia?

वेळेवर प्रीमियम न भरणे

जर विमाधारकाने वेळेवर हप्ते भरले तरच Life Insurance ऍक्टिव्ह राहतो. हे लक्षात घ्या कि, इन्शुरन्स कंपन्या थकीत हप्ता भरण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांचा कालावधी देतात. स्क्रिपबॉक्सचे चीफ बिझनेस ऑफिसर असलेले अनूप बन्सल सांगतात की,” जर विमाधारकाने वाढीव कालावधीतही प्रीमियम भरला नाही तर पॉलिसी लॅप्स होते.”

Life Insurance And Its Types In Nepal | Investopaper

कॉन्टेस्ट पीरियड

इन्शुरन्स पॉलिसी घेण्याच्या दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीला कॉन्टेस्ट पीरियड असे म्हंटले जाते. या काळात जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर Life Insurance क्लेम नाकारला जातो. मात्र, सर्वच क्लेम फेटाळले जात नाहीत. या कालावधीत मृत्यू झाल्यास, तसेच पॉलिसीधारकाने चुकीची माहिती देऊन पॉलिसी घेतली आहे का हे पाहण्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडून विमाधारकाने दिलेल्या माहितीची कसून तपासणी केली जाते.

Life Insurance Guide to Policies & Companies | U.S. News

नॉमिनी नसणे

साधारणपणे पॉलिसीधारकाकडून त्याच्या पालकांना नॉमिनी केले जाते. मात्र बऱ्याचदा असे घडते की नॉमिनीचा देखील मृत्यू होतो ज्यानंतर क्लेम केला जातो. अशा परिस्थितीत, नॉमिनी व्यक्ती नसल्यामुळे Life Insurance क्लेम नाकारला जातो. त्यामुळे, पॉलिसीधारकाने त्याच्या/तिच्या नॉमिनीचे डिटेल्स नेहमी अपडेट ठेवले पाहिजेत.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://licindia.in/

हे पण वाचा :

Technology : कॉम्प्युटरवरून चुकून डिलीट झालेल्या फाईल्स अशाप्रकारे करा रिकव्हर !!!

Investment Tips : वयाच्या 21 व्या वर्षापासून अशाप्रकारे गुंतवणूक सुरू करून मिळवा लाखो रुपये !!!

Mercedes Electric Car : मर्सिडीजने लॉन्च केली इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये 580 किमी धावणार

Train Cancelled : आजही रेल्वेकडून 154 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे तपासा ट्रेनचे स्टेट्स

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, आजचे नवीन दर पहा