पुणे | महाराष्ट्रात सुमारे १ कोटी लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजाने आरक्षणासाठी शासनाकड़े लिंगायत महासंघाने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. लिंगायत वाणी समाजाला आरक्षण मिळते परन्तु इतर वीरशैव, हिंदू लिंगायत, व फक्त लिंगायत यांना खुल्या प्रवर्गातच आहेत त्यांनाही ओबीसी प्रमाणे आरक्षण मिळावे अशी मागणी पत्रकार परिषदेत लिंगायत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुदर्शन बिरादर यानी केले.
तसेच मराठा धनगर मुस्लिम आरक्षणाला यावेळी पाठिंबा देण्यात आला. ३० मार्च २०१८ च्या लातूर येथे राज्यव्यापी बसव महामेळावा घेण्यात आला होता,त्यांन्तर शासनाने २७/४/२०१८ रोजी सोलापुर येथील मेळाव्यात १५ दिवसांत हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल होतं. अद्यापहि या प्रश्नाच निराकरण झाले नसल्याने लिंगायत महासंघाने स्पष्ट केले, शासनाने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा मराठा क्रांति मोर्चा सारख आम्हीही रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.