LinkedIn Job Search | आजकाल चांगले शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळणे खूप अवघड झालेले आहे. त्याचप्रमाणे जे नोकरी करतात. त्यांच्या नोकऱ्या देखील सुटत चाललेल्या आहेत. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळणे आजकाल खूप अवघड झालेले आहे. परंतु आता तुम्ही लिंक्डइनच्या माध्यमातून जॉब शोधू शकता. आणि हा जॉब नक्की कसा शोधायचा याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या संदर्भात काही टिप्स देखील देणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही लिंक्डइनवर (LinkedIn Job Search सहजपणे जॉब शोधू शकता. तुम्हाला ज्या क्षेत्राचे ज्ञान आहे. त्या क्षेत्रात तुम्हाला अगदी घरबसल्या नोकरी मिळेल.
लिंक्डइन ॲप डाऊनलोड करा | LinkedIn Job Search
सगळ्यात आधी तुम्हाला लिंक्डइन हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. नोकरी मिळवण्यासाठी हा अत्यंत उत्तम असा पर्याय आहे. त्यानंतर त्यात तुम्हाला लॉगिन करावे लागेल. अकाउंट लॉगिन केल्यानंतर त्यात तुम्हाला तुमची सविस्तर माहिती भरावी लागेल. जसे की तुमचे शिक्षण, तुमचे वय, तुम्ही कोणत्या कंपनीत किती वर्ष काम केले आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे कोणते स्किल आहे. तुम्हाला कामाचा किती अनुभव आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायच्या आहेत. त्यानंतरच तुम्हाला नोकरी मिळण्याची एक उत्तम संधी निर्माण होऊ शकते.
अशा पद्धतीने लिंक्डइनवर शोधा जॉब
तुम्ही या लिंक्डइनवर प्रोफाइल तयार केल्यानंतर तुम्हाला आता नोकरी शोधण्याचे पर्याय मिळेल. यामध्ये तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे, ते निवडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला क्षेत्र निवडले त्याची माहिती तुम्हाला रोज ॲपमध्ये मिळेल. तुम्ही नोटिफिकेशन ऑन ठेवू शकता. जेणेकरून रोजचे काही नोकरीचे अपडेट्स येतील. ते तुमच्यापर्यंत लगेच मिळतील. याअधI लिंक्डइन केवळ इंग्लिश या भाषेत उपलब्ध होते. परंतु आता हिंदी भाषेत देखील उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने नोकरी मिळू शकता.