हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्याच विद्येच्या माहेरघरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठात मुलींच्या वस्तीगृहात काही मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन अन धूम्रपान केले जात आहे. याबाबतच काही फोटो आणि व्हिडिओ समोर आलाय . हे प्रकरण एका वस्तीगृहातील मुलीने उघडकीस आणले असून, याची तक्रार तिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद केली आहे. तर चला हे नेमकं प्रकरण काय आहे, हे जाणून घेऊयात.
वस्तीगृहातील मुलींवर तक्रार करूनही कारवाई नाही –
वसतिगृहात वास्तव करत असलेल्या एका विद्यार्थीनीने या सर्व गैरप्रकारची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. पण संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थीनी प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे. पण मद्य प्राशन अन धूम्रपान करणाऱ्या वस्तीगृहातील मुलींवर तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठात नेमकं चालय तरी काय असा प्रश्न उपस्थिक होतोय.
नेमकं प्रकरण काय –
मागील जुलै – ऑगस्टपासून सुषमा जाधव या विद्यार्थीनीच्या रूममेट मद्य प्राशन अन धूम्रपान करून तिला त्रास देत आहेत. एकेदिवशी तिला जबरदस्तीने दारू पिण्यास भाग पाडले अन तिचा व्हिडीओ बनवला . यानंतर तिला त्या मुलींनी धमकी दिली कि , जर तू आम्ही मद्य प्राशन अन धूम्रपान करत असलेली गोष्ट कोणाला सांगितलीस किंवा तक्रार केली , तर आम्ही तुझा हा व्हिडीओ सर्वाना दाखवणार. या भीतीमुळे पीडित विद्यार्थीनीने कुठेही तक्रार केली नाही. पण त्यांचा हा त्रास वाढत निघाला होता. त्यानंतर तिने विद्यापीठ प्रशासनाकडे लेखी तक्रार केली , पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे जाऊन पत्र व्यवहाराच्या माध्यमातून तक्रार केली आहे.
विद्यार्थी परिषदेकडून आंदोलनाचा इशारा –
नशा मुक्त कॅम्पस होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने उपाय योजना कराव्यात अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाने पुढील आठ दिवसाच्या आत या प्रकरणाची दखल घ्यावी , असे सांगण्यात आले आहे.