Bank Holidays: एप्रिलमध्ये किती दिवस बँकांना टाळं असेल? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुढील रविवारी म्हणजेच 31 मार्च रोजी मार्च महिना संपून एप्रिल महिन्याला सुरुवात होईल. या एप्रिल महिन्यामध्ये बँकांना तब्बल 14 दिवस सुट्टी असणार आहेत. (Bank Holidays) या 14 सुट्ट्या नेमक्या कोणत्या तारखेला? कोणत्या दिवशी असतील? हे सर्व बँकधारकांना माहीत असणे आवश्यक आहे. कारण, सर्व गोष्टी डिजिटल पद्धतीने उपलब्ध झाल्या असल्या तरी अनेक अत्यावश्यक कामांसाठी बँकेत जावे लागते. कर्ज काढणे असो किंवा बँक खाते उघडणे असो अशी कामे बँकेत जाऊनच केली जातात. यात ऐनवेळी बँक बंद असली की मोठी पंचायत होते. त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीची बँकेची कामे खोळंबू नये यासाठी रिझर्व बँकेकडून अगोदरच सुट्ट्यांची(Bank Holiday) यादी जाहीर करण्यात येते.

एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी(Bank Holidays)

1 एप्रिल – आर्थिक वर्षाच्या शेवटी बँक खाते बंद करण्यात आल्यामुळे 1 एप्रिलला बँक बंद राहील.

5 एप्रिल – श्रीनगर, जम्मू आणि तेलंगणामध्ये जुमात-उल-विदा यानिमित्त आणि बाबू जगजीवन राम यांचा वाढदिवस असल्यामुळे बँक बंद राहिलं.

7 एप्रिल – या दिवशी रविवार असल्यामुळे बँकेला साप्ताहिक सुट्टी असेल.

9 एप्रिल – विविध सणांमुळे बेलापूर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमधील बँका बंद असतील.

10 एप्रिल – ईद असल्यामुळे कोची आणि केरळमध्ये बँकेला सुट्टी असेल.

11 एप्रिल – यादिवशी देशभरामध्ये ईदनिमित्त बँका बंद राहतील.

13 एप्रिल – दुसऱ्या शनिवारमुळे बँकेला सुट्टी असेल.

14 एप्रिल – रविवार असल्याकारणाने बँकेला सुट्टी असेल.

15 एप्रिल – हिमाचल दिन असल्याने गुवाहाटी आणि शिमलामधील बँका बंद राहतील.

17 एप्रिल – यादिवशी रामनवमी आल्यामुळे अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूर येथील सर्व बँका बंद राहतील.

20 एप्रिल – आगरतळा येथील बँकाना सुट्टी असेल.

21 एप्रिल – यादिवशी सर्व बँकांना रविवारची सुट्टी असेल.

27 एप्रिल – चौथा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहतील.

28 एप्रिल – यादिवशी ही बँकेला साप्ताहिक सुट्टी असेल.