Bank Holiday: महत्त्वाची कामे पुढच्या आठवड्यातच उरका!! जून महिन्यात बँकाना आहेत भरपूर सुट्ट्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bank Holiday| तुम्हाला जर बँकेशी संबंधित एखादे काम करायचे असेल तर ते पुढच्याच आठवड्यात करून घ्या. कारण, पुढच्या आठवड्यात मे महिना संपला की जून महिना सुरू होईल आणि जून महिन्यामध्ये बँकांना जास्त आहेत. जून महिन्यात दर आठवड्याच्या रविवारी सुट्ट्या आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्ट्या तसेच इतर सणावारांच्या सुट्ट्या मिळून बँक 10 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळेच सर्वांनी आपली बँकेची कामे आटपून द्यावीत.

जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holiday)

2 जून 2024 – बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

8 जून 2024 – दुसरा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहतील.

9 जून 2024 – रविवारमुळे बँक बंद असेल.

15 जून 2024 – YMA दिवस आणि राजा संक्रांती निमित्ताने बँकेला सुट्टी असेल. मिझोराम आणि ओडिशात 15 जून रोजी संक्रांतीमुळे बँक बंद असतील.

16 जून 2024 – रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल.

17 जून 2024 – ईद-उल-अजहानिमित्त मिझोराम, सिक्कीम आणि इटानगर वगळून देशभरातील बँका बंद राहतील.

21 जून 2024 – वटसावित्री वृत्त असल्यामुळे राज्यांतील अनेक बँका बंद राहतील.

22 जून 2024 – संत गुरु कबीर जयंती असल्यामुळे छत्तीसगढ़, हिमाचल प्रदेश, हरियाणा पंजाब येथील बँका बंद राहतील.

30 जून 2024 – रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.