सातारला पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी ‘हे’ उमेदवार पात्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी अर्ज केले आहेत. यातील साताऱ्यात तीन तृतीयपंथीय उमेदवारांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर जिल्ह्यात परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या तरुण-तरुणी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतल्यानंतर आता लेखी परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी सातारा जिल्हा पोलीस दलाकडून प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.

सातारा जिल्हा पोलीस भरती 2011 मधील पोलीस शिपाई पदाकरिता ऑनलाईन आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी दि. 04 जानेवारी 2023 ते दि. 08 जानेवारी 2023 रोजी पर्यंत घेण्यात आली होती. त्याअनुषंगाने उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी / हरकतीची पडताळणी केल्यानंतर त्याबाबत योग्य ती कार्यवाही करून शारीरिक व मैदानी चाचणीची अंतिम गुणवत्ता यादी दि. 20 जानेवारी 2023 रोजी सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत माध्यमांद्वारे प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2021 च्या अनुषंगाने शारीरिक चाचणी व मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी 50 टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून प्रवर्गनिहाय जाहिरातमध्ये दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी अधिकृत www.satarapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी येथे CLICK करा.

प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमध्ये प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणानुसार उमेदवारांच्या काही तक्रारी / हरकती असल्यास 20 मार्च 2023 रोजी 18:00 वाजेपर्यंत (सायबर पोलीस ठाणे 02162-234130 Extn – 238) या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.