मार्चमध्ये शाळांना ‘इतक्या’ सुट्ट्या …. विद्यार्थ्यांना मिळणार रंगांच्या सणाचा आनंद

0
39
school holidays list
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेब्रुवारी महिना संपत आला आहे आणि आता मार्च महिन्याची वाट पाहिली जात आहे. मार्च महिन्यात होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा आणि ईद-उल-फितर यांसारखे महत्त्वाचे सण येत असल्याने शाळांना या त्योहारांच्या निमित्ताने अनेक सुट्ट्या मिळणार आहेत. या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांना आनंदाचे क्षण मिळतील, पण त्याचवेळी शैक्षणिक कार्यक्रमांवरही परिणाम होणार आहे. तर या सुट्या कधी असणार आहेत , याची आज आपण माहिती पाहणार राहतो.

होळी आणि रंगपंचमी

होळीच्या निमित्ताने 13 मार्च रोजी होलिका दहन आणि 14 मार्च रोजी होळीची सुट्टी असणार आहे. यानंतर 15 आणि 16 मार्च रोजी साप्ताहिक सुट्ट्या असल्याने विद्यार्थ्यांना चार दिवसांचा अवकाश मिळणार आहे. होळी हा रंगांचा सण असल्याने विद्यार्थ्यांना हा काळ खूप आवडतो. मार्च महिन्याच्या शेवटी 30 मार्च रोजी गुढीपाडवा आणि 31 मार्च रोजी ईद-उल-फितर या सणांच्या निमित्ताने सुट्ट्या असतील. या सणांमुळे विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांची ओळख होते.

सुट्ट्यांचा शैक्षणिक परिणाम –

सुट्ट्यांमुळे शैक्षणिक कार्यक्रमांवर परिणाम होतो, पण त्याचवेळी विद्यार्थ्यांना आराम आणि मनोरंजनाची संधी मिळते. शाळांनी या सुट्ट्यांचा विचार करून शैक्षणिक योजना तयार करणे गरजेचे असते.