उद्धव ठाकरे गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर!! या 40 जणांकडे दिली जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज सामनाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना, “गद्दारांना आणि पक्षफोड्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याच्या निर्धाराने शिवसेना लोकसभेच्या लढाईत उतरली आहे” असा टोला ही ठाकरे गटाकडून लगावण्यात आला आहे. तसेच “आता झंझावाती प्रचार सुरू होत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात वाघाची डरकाळी घुमणार आहे.” असेही ठाकरे गटाने म्हणले आहे.

40 स्टार प्रचारकांच्या नावांची यादी

आज ठाकरे गटांकडून जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह 40 स्टार प्रचारकांचा समावेश आहे. ज्यामध्ये , शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अॅड. अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांची नावे आहेत.

तसेच, “विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी यांचा देखील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.