वडोदरा : वृत्तसंस्था – गुजरातमधील वडोदरा येथील नंदेसरी GIDC या परिसरातील दीपक नायट्रेट कंपनीत स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग (fire) लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. वडोदरा शहराबाहेरील नंदेसरी औद्योगिक क्षेत्रातील दीपक नायट्रेट रासायनिक उत्पादन प्रकल्पाच्या एका भागाला गुरुवारी संध्याकाळी भीषण आग (fire) लागली. या आगीमध्ये (fire) जखमी झालेल्या सात कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कारखान्याच्या आसपास राहणाऱ्या सुमारे 700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
#WATCH | Huge explosion, followed by fire, occurs at Deepak Nitrite Company in Nandesari GIDC in Vadodara, Gujrat. Details awaited. pic.twitter.com/xNd55HJv9P
— ANI (@ANI) June 2, 2022
700 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले
सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे (fire) धुराच्या लोळात पडलेल्या सात जणांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच पुढील खबरदारी म्हणून कारखान्याजवळील ग्रामीण भागात राहणाऱ्या सुमारे 700 लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे असे वडोदराचे जिल्हा दंडाधिकारी आरबी ब्रार यांनी सांगितले आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
वडोदरा अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, संध्याकाळी जेव्हा कारखान्यात आग (fire) लागली त्यादरम्यान एक शक्तिशाली स्फोटसुद्धा झाला. या आगीची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र एवढी भीषण आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजून समजू शकलेले नाही.
हे पण वाचा :
IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम
‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार
पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका