हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रातील तर सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. सभा घेणे, बैठका घेणे, जागा वाटपाचा तिढा सोडवणे अशा कित्येक घडामोडी राजकीय वर्तुळात घडताना दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अखेर उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती स्वतः निवडणूक आयोगाकडूनच देण्यात आली आहे.
नुकतेच ANI ने ट्विट करत म्हटले आहे की, “2024 च्या सार्वत्रिक निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.” त्यामुळेच आता उद्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येईल. तसेच पुढील काही दिवसांमध्येच देशातील राज्यांमध्ये कोणते पक्ष आणि कोणते नेते बाजी मारतील हे चित्र देखील सर्वांपुढे स्पष्ट होईल. (Lok Sabha Election 2024)