Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.हे १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावताना दिसतील. यासाठी सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली असून १८ लाख कर्मचारी मतदानप्रक्रियेसाठी तैनात आहेत. आजच्या या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत महाराष्ट्रातील ५ मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये नागपुर, रामटेक, चंद्रपूर,भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचा समावेश आहे.

कोणत्या ठिकाणी कोणामध्ये लढत

नागपूर मतदारसंघ- महायुतीचे नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास ठाकरे
रामटेक मतदारसंघ- महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे शामकुमार बर्वे
चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघ- महायुतीचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रतिमा धानोरकर
भंडारा-गोंदिया मतदारसंघ- महायुतीचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ.प्रशांत पडोळे
गडचिरोली-चिमूर मतदारसंघ- महायुतीचे अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडीचे नामदेव किरसान

महाराष्ट्राशिवाय अन्य कोणत्या राज्यात मतदान?? Lok Sabha Election 2024

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्राशिवाय तामिळनाडूमध्ये सर्व 39 जागा, मध्य प्रदेशातून 6, मणिपूरमधून 2, मेघालयातून 2,लक्षद्वीपमध्ये 1 जागा, अरुणाचल प्रदेशमधून 2, बिहारमधून 4, आसाममधून 4, छत्तीसगडमधून 1, सिक्कीममधून 1, त्रिपुराच्या 1, उत्तर प्रदेशच्या 8, उत्तराखंडच्या 5, पश्चिम बंगालच्या 3,मिझोराममधून 1, नागालँडमधून 1, राजस्थानमधून 12, अंदमान आणि निकोबारच्या 1, जम्मू-काश्मीरच्या 1, लक्षद्वीपच्या 1 आणि पुद्दुचेरीच्या 1 जागेवर मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे.