Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील हे 18 व्यक्ती लोकसभा लढवण्यास ठरले अपात्र; यामागील कारण आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. महत्वाचे म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 18 व्यक्तींना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही. कारण की, या व्यक्तींनी अद्याप निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केलेले नाही. याबाबतची माहिती आजच्या पत्रकार परिषदेत आयोगाकडून देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने या 18 लोकांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये नेमका कोणाचा समावेश आहे आपण जाणून घेऊया.

हे व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र राहणार

मोहम्मद मेहमूद सय्यद शाह – मुंबई उत्तर- मध्य विधानसभा मतदारसंघ

गायकवाड दिनकर धारोजी – जिंतूर विधानसभा मतदारसंघ परभणी

अमर शालिकराम पांढरे – आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया पांडुरंग टोलाबा वान्ने – लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड

गोविंदा अंबर बोराळे – नांदगाव विधानसभा मतदारसंघ नाशिक

आव्हाड महेश झुंजार – नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ नाशिक

हबीबुर रहमान खान – भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ ठाणे

महेंद्र राजेंद्र बोराडे – बीड विधानसभा मतदारसंघ बीड

मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बाल – मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ मुंबई

पांडुरंग टोलाबा वान्ने – लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड

उमेशकुमार मुलचंद सरोटे – आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया

दीपक चंद्रभान गाडे – अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ ठाणे

नरेंद्र धर्मा पाटील (साळुंखे) – सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ धुळे

विशाल दत्ता शिंदे – किनवट विधानसभा मतदारसंघ नांदेड

इम्रान बशर – नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ नांदेड

सुमीत पांडुरंग बारस्कर – चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई

ब्रिजेश सुरेंद्रनाथ तिवारी – चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई

मोहम्मद इम्रान कुरेशी – चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई

मुदसरुद्दीन अलिमुद्दीन – नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ नांदेड