लोकसभेत पवार- ठाकरेंना फक्त 3 जागा?? ओपिनियन पोलमधून मविआला हादरवणारी बातमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी देशातील तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांची महविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदे गट आणि अजित दादा गट यांची महायुती असा थेट सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूनी जागावाटपावर लवकरच अंतिम निर्णय होईल. मात्र त्यापूर्वीच महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) हादरवणारी एक बातमी समोर येत आहे. झी न्यूजच्या ओपिनियन पोलमधून यंदाच्या लोकसभेसाठी एकूण ४८ जागांपैकी फक्त ३ जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळवता येईल, तर भाजप महायुतीला तब्बल ४५ जागा जिंकता येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या ओपिनियन पोलनुसार, मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एनडीएच्या जागांमध्ये 7 जागांची भर पडेल आणि त्यांची मतांमध्ये 4.6 % वाढ होईल. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा मात्र आधीपेक्षा 6 ने कमी होतील आणि मतांमध्ये सुद्धा 4.1 % घट होईल असं सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा हा भाजपला होणार असल्याचं या सर्व्हेमध्ये म्हटलं गेलं आहे. अजित पवार एनडीएत सहभागी झाल्याचा लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल असं विचारण्यात आलं असता 28 % लोकांना फार परिणाम होईल असं म्हंटल तर 32 % लोकांना काही प्रमाणात असं मत नोंदवलं आहे, तर 22 % लोकांनी म्हंटल आहे कि अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे नुकसान होईल.

काही दिवसांपूर्वी एबीपी सी व्होटर सर्व्हेमध्ये मात्र महाविकास आघाडीला लोकसभेत मोठ्या प्रमाणावर जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आज जर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली तर सी व्होटर सर्व्हेनुसार भाजप महायुतीला+ 19-21 जागा मिळाल्या असत्या, तर महाविकास आघाडीला + 26-28 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता, तर इतरांना 0-2 जागा मिळाल्या असत्या असेही या सर्व्हेत म्हंटल होते. मतांच्या टक्केवारीनुसार, भाजपला + 37 टक्के, काँग्रेसला+ 41 टक्के आणि इतरांना 22 टक्के मते मिळतील असा ओपिनियन पोल एबीपी सी व्होटर सर्व्हेमधून देण्यात आला होता.