Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका कधी होणार?? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून देशात लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग केव्हाही जाहीर करू शकत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला सुद्धा लागले आहेत. त्यातच आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि राज्य विधानसभा निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज असून सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे असं राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी म्हंटल.

निवडणूक आयुक्त नेमकं काय म्हणाले? Lok Sabha Election 2024

शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना निवडणुकीच्या तारखांबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही निवडणुकांसाठी तयार आहोत आणि सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. “आयोगाच्या वतीने मी तुमच्या (माध्यमांच्या) माध्यमातून विनंती करू इच्छितो की, ओडिशातील सर्व मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. राजीव कुमार यांच्या या विधानाने आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम मार्च मध्ये जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, 2024 ची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) एप्रिल आणि मे महिन्यात होऊ शकते. त्यासाठी सात ते आठ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. मे महिन्यातच निवडणुकीचे निकाल येऊ शकतात. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे. त्यापूर्वीच नवी लोकसभा अस्तित्वात येणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 9 टप्प्यात मतदान झाले होते. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 7 टप्प्यात मतदान झाले. आता 2024 च्या लोकसभा निवडणुका सुद्धा ७ ते ८ टप्प्यात होण्याची शक्यता आहे.