INDIA की NDA? देशात सत्ता कोणाची? निकालाच्या जलद अपडेटसाठी Dailyhunt पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून आता 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपप्रणीत NDA विरुद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखालील INDIA आघाडीत यंदा थेट सामना पाहायला मिळाला आहे. सलग तिसऱ्यांदा आपली सत्ता आणण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली होती, तर कोणत्याची परिस्थितीत मोदींची सत्ता उलथवून टाकण्याचा चंग INDIA आघाडीने बांधलाय. दोन्ही गटाकडून आपापल्या विजयाचे दावे करण्यात येत असून उद्या ४ जूनच्या निकालातच देशाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. देशातील एकूण 543 लोकसभा जागांसाठी 8,360 उमेदवारांचे भवितव्य उद्याच्या निकालात ठरणार आहे.

यापूर्वी, 1 जून रोजी झालेल्या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए मोठा विजय मिळेल असा दावा वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी केला आहे. या सर्वेक्षणांनुसार, इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाने NDA ला 361-401 जागांचा अंदाज वर्तवला आहे, न्यूज 24-टूडेज चाणक्यने 400, एबीपी न्यूज-सी मतदाराचा अंदाज 353-383, रिपब्लिक भारत-पी मार्कने अंदाज 359, इंडिया न्यूज-डी-डायनॅमिक्सने 371जागांचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय रिपब्लिक भारत-मॅट्रिझचा अंदाज 353-368 जागा, दैनिक भास्करचा अंदाज 281-350, न्यूज नेशनचा अंदाज 342-378, TV9 भारतवर्ष-पोलस्ट्रॅटचा अंदाज 342, टाइम्स नाऊ-ईटीजीचा अंदाज 358, इंडिया टीव्ही-सीएनएक्स आणि जन की बातने अंदाजे ३६२-३९२ जागांचा अंदाज वर्तवत देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता येईल असं म्हंटल आहे. परंतु एक्झिट पोल नेहमीच अचूक नसतात हे सुद्धा तितकंच खरं आहे. म्हणूनच उद्याच्या ४ जूनच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणूक निकालासाठी उद्या 4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. सुरुवातीलाच कोण कोण उमेदवार आघाडीवर आहे? काय ट्रेंड सुरु आहे यावरून आपल्याला निकालाचा अंदाज येईलच. दुपार पर्यंतच निकालाचे एकूण चित्र स्पष्ट होईल. मात्र अंतिम निकाल उद्या ४ जूनला रात्री किंवा ५ जूनला सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल अगदी जलद आणि अचूकपणे मतदारांपर्यंत पोचवण्याचे काम प्रसिद्ध मीडिया प्लॅटफॉर्म डेलीहंट करत आहे. Dailyhunt वर तुम्हाला लोकसभा निकालाचे थेट कव्हरेज पाहायला मिळेल.

निवडणुका केवळ आकड्यांवर नसतात, असे आमचे मत आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निकाला पर्यंत पोहोचण्यासाठी डेटा, नमुने आणि विश्लेषणाचा अर्थ लावण्यावर आमचे लक्ष आहे. आम्ही सर्व कानाकोपऱ्यातून विश्लेषण करू आणि डेटा आणि त्याचा अर्थ काय आहे याचा सखोल अभ्यास आपल्यापुढे सादर करू. या निवडणूक निकालाचे विश्लेषण अशा प्रकारे सादर केले जाईल की ते सर्वसामान्य व्यक्तींपासून ते राजकीय तज्ञापर्यंत सर्वजण अत्यंत सोप्या पद्धतीने समजू शकेल.

Dailyhunt च्या कव्हरेज मध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल.

1) एका चांगल्या मांडणीच्या स्वरूपात निकालांचे लाइव्ह अपडेट
2) सध्याच्या निवडणुकीतील आकडेवारी आणि त्याची मागील निकालांशी तुलना
3) राज्यवार आणि मतदारसंघनिहाय जागांच्या निकालाचे अपडेट
4) सोशल मीडियावरील प्रतिक्रिया तसेच ट्विटरवरील ट्रेंडिंग स्टोरीज
5) याशिवाय थेट व्हिडिओ, व्हायरल मिम्स, ट्रेंडिंग स्टोरीज, व्हिडिओ असा सर्वसमावेशक गोष्टी डेलिहंटच्या कव्हरेज मधून मिळतील.

Stay tuned with Dailyhunt