Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाची फक्त 10 जागांवर बोळवण? अमित शहांच्या प्रस्तावाने खासदारांच्या पोटात गोळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) अगदी तोंडावर आली असली असली राज्यातील भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या जागावाटपाचा तेढ अजून सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यात तब्बल 40 मिनिटं बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदेनी आपल्या सर्वच्या सर्व खासदारांना पुन्हा तिकीट द्यावं अशी आग्रही मागणी केल्याचे समजत आहे. मात्र अमित शहांनी मात्र शिंदेंची हि मागणी फेटाळली असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २२ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागांची मागणी भाजपकडे केली आहे. मात्र टाईम्स नाऊनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री अतिथीगृहावर शहांनी काल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची भेट घेतली. त्यात भाजपनं ३२-१०-६ चा फॉर्म्युला दिला. म्हणजेच शिंदे गटाची अवघ्या १० जागांवर बोळवण अमित शहा यांनी केली आहे. तर अजित पवार याना लोकसभेच्या ६ जागा देण्यात येतील.

एकनाथ शिंदे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न अमित शाह यांनी केला. यावेळी त्यांनी थेट काही मतदार संघातील परिस्थिती सुद्धा सांगितली. शिवसेनेचे काही उमेदवार जिंकणार नाहीत, तिथे भाजपा जिंकू शकते, असा अमित शाह यांचा सूर होता. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा जास्त जिंकून येण्याची शक्यता आहे, त्यामुळे आम्हाला जास्तीच्या जागा हव्यात. लोकसभेननंतर जेव्हा विधानसभा निवडणुका येतील तेव्हा आम्ही मित्रपक्षांना जास्तीच्या जागा देऊ असं आश्वासन अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना दिल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचा प्रस्ताव मान्य केल्यास शिंदेंच्या ३ खासदारांचे तिकीट कापलं जाऊ शकते. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या १३ खासदार आहे. अशा परिस्थितीत काही जण ठाकरे गटात परतण्याची शक्यताही नाकारता येत नाही.