Lok Sabha Election 2024 : युवराज सिंग भाजपकडून लोकसभा लढवणार? स्वतःच केला खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम निवडणूक आयोग केव्हाही जाहीर करण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. जागावाटप आणि उमेदवारांची यादी सर्व पक्षांकडून अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराज सिंग (Yuvraj Singh) भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतो अशा चर्चाना वेग आला होता. युवराज गुरुदासपूरमधून निवडणूक लढवणार अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या. युवराज आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातील भेटीनंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले.मात्र आता खुद्द युवराज सिंगनेच याबाबत खुलासा करत निवडणुकांबाबत सर्व काही अफवा असल्याचे म्हंटल आहे.

युवराजने त्याच्या ट्विटर अकाऊंवर वरून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. त्याने म्हंटल, मी गुरुदासपूरमधून निवडणूक लढवत नाही. लोकांना पाठिंबा देणे आणि मदत करणे ही माझी आवड आहे आणि मी माझ्या @YOUWECAN फाउंडेशनच्या माध्यमातून मी हे काम असेच पुढे करत राहीन. आपल्या क्षमतेनुसार बदल घडवत राहू या. असं म्हणत त्याने आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट केलं. तसेच मीडिया मध्ये सुरु असलेल्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

सनी देओल गुरुदासपूरचा विद्यमान खासदार – Lok Sabha Election 2024

सध्या अभिनेता सनी देओल गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपचा खासदार आहे. मात्र सप्टेंबर 2023 मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इथून पुढे आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सनी देओलने स्पष्ट केलं होते. ‘मी राजकारणासाठी योग्य नाही… मला आता निवडणूक लढवायला आवडणार नाही. मी फक्त अभिनेता म्हणून काम करत राहिलो तर बरे होईल असं सनी देओलने म्हणल्यानंतर भाजपला आता गुरुदासपूरमध्ये नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल. युवराजने नकार दिला असला तरी अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री कंगना राणावत भाजपकडून २०२४ ची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्याची शक्यता आहे.