“लोकसभा निवडणुका पुढील दीड महिन्यातच होतील”, प्रकाश आंबेडकरांच खळबळजनक वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून विरोधकांची INDIA विरुद्ध मोदी सरकारची NDA आघाडीमध्ये जोरदार फाईट बघायला मिळणार आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. देशात पुढील दीड महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका लागतील असं भाकीत त्यांनी केल आहे. औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

“लोकसभेच्या निवडणुका महिना दीड महिन्यात होतील. दीड महिन्यानंतर विचारा कशा काय होतील? त्यावेळी सांगतो. आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागलो आहोत. भाजपच्या विरोधात लढू. आमचे उमेदवार उभे करू” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे. इतकेच नव्हे तर, “शिवसेनेसोबत आमची युती आहेच. महाविकास आघाडीशी आमचा संबंध नाही. त्यामुळे निवडणुकीत काय करायचं हे महाविकास आघाडीने त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही शिवसेनेसोबत आहोत. त्यांनी त्यांचं पाहावं. आम्ही का डोकं लावावं? आम्ही का आमचा बीपी वाढवून घ्यावा? आमची आघाडी शिवसेनेसोबत आहे. आमचा समझौता शिवसेनेसोबत होईल” अशी ठाम भूमिका देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मांडली आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी मणिपूर हिंसाचाराबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. माझा हा आरोपच आहे की मणिपूर हिंसाचार हा अदानीसाठीस सुरू आहे. खनिजावर ताबा हा आदिवासींचा आहे. मैतेई समुहाने आरक्षणाची मागणी केली नाही. अचानकपणे मैतेई समाजाला आदिवासी का घोषित केलं गेलं? संविधानानुसार पहाडी इलाक्यात तिथे आदिवासी कौन्सिल असतात. तिथे काही करायचं असेल तर आदिवासींची परवानगी घ्यावी लागते. त्यांनी अदानी आणि इतरांना मायनिंग दिल्या. पण हिल कौन्सिल त्याला मंजुरी देत नाहीये. त्यामुळे या खाणीच्या मंजुरीसाठीच मैतेई समाजाला आरक्षण देण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी लावला आहे.