विद्यापीठात संशोधकांच्या लांबच-लांब रांगा; कोरोना मार्गदर्शक सूचनांचा बट्ट्याबोळ

0
46
BAMU
BAMU
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागातर्फे पी. एचडीसाठी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची आज सबमीशनची तारीख होती. यासाठी राज्यासह इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी सबमिशनसाठी गर्दी केली होती.

आज सकाळपासून संशोधक विद्यार्थ्यांच्या सबमिशनसाठी रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. दिवसेंदिवस कोरोना व डेल्टा प्लस चा धोका असतानाही कोरोना नियमांची याठिकाणी पायमल्ली होताना पाहायला मिळाले. सबमिशन साठी एकच खिडकी उघडी असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती.

शेकडो किलोमीटर लांबून येऊन अनेक विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थिनींना रांगेत थांबावे लागले. अनेक विवाहित विद्यार्थिनिसोबत त्यांचे लहान मुलेही होते. एवढ्या लांबून येऊनही सबमिशन न झाल्यामुळे, सबमिशनची तारीख वाढवून द्यावी व सबमिशनसाठी अजुन खिडक्या वाढवाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here