Petrol पंपावर Zero नव्हे तर ‘या’ गोष्टीकडे लक्ष्य द्या; अन्यथा होईल मोठं नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल पंपावर (Petrol Pump) पेट्रोल चोरीच्या घटना बद्दल आपण सतत ऐकत असतो. आपण पेट्रोल भरताना टाईम मशीनमधील झिरो कडे बघून ठरवतो की आपले पेट्रोल चोरीला जात आहे की नाही, परंतु हे सपशेल चुकीचं आहे. झिरो वर लक्ष केंद्रित करून देखील बऱ्याच वेळेस पेट्रोल चोरी केले जाते. पेट्रोलची घनता आणि शुद्धता यामध्ये काही घोळ करून पेट्रोलची चोरी केली जाण्याची शक्यता असते . खराब दर्जाचे पेट्रोल वापरलयास गाडीवर सुद्धा त्याचा उलटा परिणाम होतो.

तर आता बघूया पेट्रोल आणि डिझेलची घनता कशी तपासायची, या पेट्रोल आणि डिझेलच्या घनतेसाठी मानके निश्चित करण्यात आलेली आहे. पेट्रोलची घनता 730 ते 800 किलो प्रति घनमीटर आहे. तर, डिझेलच्या शुद्धतेची घनता 830 ते 900 kg/M3 पर्यंत असते. त्याची श्रेणी निश्चित नसते. जसजसं तापमान चेंज होतं त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलची घनता बदलत असते. यामुळे पेट्रोल पंपावर दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलची घनता चाचणी अपडेट केली जाते.

अशी चेक करा पेट्रोल आणि डिझेलची घनता-

पेट्रोल आणि डिझेल ची घनता चेक करण्यासाठी एक फिल्टर पेपर घ्या. त्यावर फक्त दोन थेंब पेट्रोल किंवा डिझेल टाका फिल्टर पेपर मधून पेट्रोल दोन मिनिटात उडेल. आणि ते वाळल्यावर त्याचा रंग गडद होऊन डाग राहील. असं झाल्यावर समजायचं की त्या पेट्रोलमध्ये भेसळ आहे. जर तुमच्या कार मध्ये कमी घनतेचे पेट्रोल टाकले जात असेल तर तुम्ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार याबद्दल तक्रार करू शकता.