LookBack2022 : Sport मध्ये मिळाले अनेक अविस्मरणीय क्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 हे साल संपायला अवघे काही दिवस राहिले असून लवकरच आपण सर्वजण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. 2022 हे वर्ष क्रीडा जगतात भारतासाठी खूप चांगले गेले. क्रिकेट मध्ये यावर्षी थोडीफार प्रमाणात निराशा झाली मात्र यावर्षी राष्ट्रकुल खेळापासून थॉमस चषकापर्यंत सर्वत्र चमकदार कामगिरी करत देशाला अनेक अविस्मरणीय क्षण मिळाले. चला जाणून घेऊयात त्याबाबत सविस्तरपणे…

अंडर-19 संघाने पाचव्यांदा जिंकला विश्वचषक-

खरं तर भारताच्या मुख्य क्रिकेट संघाला यंदा अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला. मात्र भारताच्या अंडर-19 संघाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकून इतिहास रचला. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 4 विकेट्स राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. या विजयासोबतच भारतीय क्रिकेट संघाच्या नावावर सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रमही आहे.

indian women

राष्ट्रकुल मध्ये महिलांनी रचला इतिहास-

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. फायनल सामन्यात भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आणि भारत सुवर्णपदक जिंकण्यापासून वंचित राहिला. परंतु, राष्ट्रकुलमध्ये प्रथमच भारतीय क्रिकेटने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता.

थॉमस कपचे विजेतेपद-

बॅडमिंटनमध्येही भारताची कामगिरी उत्कृष्ट होती. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव करत थॉमस कपचे विजेतेपद पटकावले. तब्बल ७३ वर्षानंतर भारताने थॉमस कप जिंकून इतिहास रचला.

virat kohli

कोहलीचे 1020 दिवसांनी शतक-

गेल्या काही महिन्यांपासून फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीने अखेर २०२२ मध्ये तब्बल 1020 दिवसांनी शतक ठोकले. अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत 122 धावा करत कोहलीने कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावले. विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्मात आल्याने भारतीय क्रिकेटला सुद्धा एकप्रकारे दिलासा मिळाला.

suraj vashisht

अंडर-17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक-

इटलीमध्ये झालेल्या ग्रीको-रोमन अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा 16 वर्षीय कुस्तीपटू सूरज वशिष्ठने सुवर्णपदक जिंकले. 55 किलो वजनी गटात सुरजने हे यश मिळवले. सूरज हा हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील रिथल गावचा रहिवासी आहे.

Nikhat Zareen

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक –

भारताची स्टार महिला बॉक्सर निकहत ने यंदाच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. तिने 52 किलोमध्ये हा इतिहास रचला.

Gujarat-Titans-

गुजरातने जिंकले IPL टायटल –

यंदा प्रथमच खेळणाऱ्या गुजरात टायटनने २०२२ चे आयपीएल जेतेपद पटकावले. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरातने ही दमदार कामगिरी केली.