LookBack2022 : ‘हे’ आहेत यावर्षी बाजारात आलेले बजेट स्मार्टफोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 हे साल समाप्तीच्या दिशेने चालले असून लवकरच आपण सर्वजण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. यावर्षी बाजारात अनेक मोबाईल लॉन्च झाले. त्यातही कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त फीचर्स देणारे मोबाईल सुद्धा बाजारात आले. आज आम्ही तुम्हाला 2022 मध्ये लॉन्च झालेले अशाच काही मोबाईल बाबत सांगणार आहोत जे अगदी तुमच्या बजेटमध्ये आहेत.

POCO X4 Pro

POCO X4 Pro-

POCO च्या या मोबाईलला 6.67-इंचाच्या AMOLED डिस्प्ले असून हा स्मार्टफोन ऑक्टाकोर 2.2 GHz ड्युअल स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर सह येतो. या मोबाईलला 6 GB रॅम मिळते. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास पाठीमागील बाजूस 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे, तर विडिओ कॉल आणि सेल्फी साठी मोबाईलला 16MPचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पोकोच्या स्मार्टफोनला 5000 mAh ची दमदार बॅटरी आहे. बाजारात या मोबाईल ची किंमत 14,999 रुपये आहे.

Xiaomi Redmi Note 11 SE

Xiaomi Redmi Note 11 SE-

Xiaomi च्या या मोबाईलला 6.43-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हा स्मार्ट न Octacore 2.05 GHz Dual MediaTek Helia G95 प्रोसेसर येत असून याला 6 GB RAM मिळते. या मोबाईलला पाठी मागील बाजूस 64MP, 8MP, 2+2MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरीचा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. बाजारात या मोबाईलची किंमत 10,999 रुपये आहे.

Realme C35

Realme C35-

Real Me चा हा स्मार्टफोन 6.44-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येतो. यामध्ये ऑक्टा-कोर 2.4 GHz ड्युअल क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आहे. मोबाईलला 4 GB रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. या मोबाईल ला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा , 2MP चा अल्ट्रा वाईड अँगल आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी रिअल मी च्या या मोबाईलला 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. 5000 mAh बॅटरीसह या मोबाईलमध्ये फ्लॅश चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. बाजारात या मोबाईलची किंमत 11,999 रुपये आहे.

vivo T1

vivo T1-

vivo च्या या मोबाईल ला 6.58-इंचाच्या सुपर AMOLED डिस्प्ले मिळतो . या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर 2.2 GHz चा ड्युअल स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. विवो च्या या मोबाईलला 4 GB रॅम देण्यात आली आहे. मोबाईल च्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 2MP अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. याशिवाय विडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपये आहे.

Samsung Galaxy F23 5G

Samsung Galaxy F23 5G-

सॅमसंग च्या या स्मार्टफोनला 6.6-इंचाचा डिस्प्ले आहे. हा मोबाईल ऑक्टाकोर 2.2 GHz ड्युअल स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर सह येतो. या मोबाईलला 50MP, 8MP आणि 2MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉल साठी फ्रंट साईड ला 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या मोबाईल ला 4 GB RAM आणि 5000 mAh ची सुसज्ज अशी बॅटरी असून बाजारात या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे.