L’Oreal Cell BioPoint Device: तुमची त्वचा किती जुनी? हे डिव्हाइस सांगेल अचूक माहिती

L'Oreal Cell BioPoint Device
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । L’Oreal Cell BioPoint Device – L’Oreal ने CES 2025 मध्ये एक अत्यंत खास डिव्हाइस सादर केले आहे, ज्याचे नाव आहे Cell BioPrint. या डिव्हाइसच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेच्या वयाची माहिती, तिच्या विशेषतांचा आढावा आणि त्वचेसाठी योग्य उत्पादनांची निवड कशी करावी हे जाणून घेऊ शकता. यामुळे त्वचेची बायोलॉजिकल अवस्था, तुम्ही वापरत असलेल्या उत्पादने योग्य आहेत की नाही आणि तुमच्या त्वचेची काय गरज आहे याचा स्पष्ट अंदाज लावला जातो . तर चला या खास डिव्हाइसबदल (L’Oreal Cell BioPoint Device)अधिक माहिती जाणून घेऊयात.

CES 2025 मध्ये नवे गॅझेट्स –

या वर्षीच्या Consumer Electronics Show (CES) मध्ये टेक्नोलॉजी कंपन्यांसोबतच इतर क्षेत्रातील कंपन्यांनीही नवीन आणि उपयोगी गॅझेट्स सादर केले आहेत. L’Oreal ने सादर केलेला Cell BioPrint हा डिव्हाइस हेच एक उदाहरण आहे.

डिव्हाइस कार्य ( L’Oreal Cell BioPoint Device) –

L’Oreal ने कोरियन स्टार्टअप NanoEn Tek सोबत मिळून Cell BioPrint तयार केले आहे. हे डिव्हाइस तुम्हाला त्वचेसाठी वैयक्तिक मार्गदर्शन करते, ज्यात तुमच्या त्वचेची बायोलॉजिकल वय, उत्पादनांचे घटक आणि कॉस्मेटिक समस्या यांचा समावेश आहे. यासाठी, तुम्हाला तुमच्या गालावरून काही सेल्स घेऊन एक गोंदाचा (adhesiv) वापर करावा लागेल. या सेल्सचा एक सोल्यूशनमध्ये समावेश करून, Cell BioPrint डिव्हाइसमध्ये लोड केला जातो. डिव्हाइस चेहऱ्याचा एक फोटो घेतो आणि काही प्रश्नांची उत्तरे घेतल्यानंतर, तुम्हाला एक अंतिम रिपोर्ट दिला जातो .

बायोमेडिकल टेक्नोलॉजीवरील काम –

L’Oreal ही कंपनी बऱ्याच काळापासून बायोमेडिकल टेक्नोलॉजीवर (L’Oreal Cell BioPoint Device) काम करत आहे, ज्यामुळे तिच्या ब्यूटी उत्पादनांची प्रभावी विक्री होऊ शकते. याआधी पॅरिसमधील Vivatech कॉन्फरन्समध्ये L’Oreal ने AI असिस्टेड ब्यूटी पेप, इन्फ्रारेड हेअर ड्रायर आणि एक 30 स्किन प्रिंटर सादर केला होता. हे डिव्हाइस कधी लाँच होईल आणि डेटा कलेक्शनबाबत अधिक माहिती कधी उपलब्ध होईल, याबाबत कंपनीने सध्या अधिक माहिती दिलेली नाही.

हे पण वाचा : अभिनेता सैफ अली खान वर हल्ला ; पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत, 6 वेळा चाकूने वार