तुम्हीही थंड पाणी पिताय? मग ‘हे’ नुकसान जाणून घ्याच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला भारत हा उष्णकटीबंधीय देश असल्यामुळे येथील लोक थंड पेयाचे (Cold Drinks) प्रेमी आहेत. मग ते कोल्ड्रिंग असो किंवा पाणी. हे थंडच लागते. त्यातच उन्हाळा असो वा हिवाळा … थंड पाणी पिणे (Cold Water)  प्रत्येकालाच आवडत. खास करून तरुण मुले मुली थंड पाणी पिण्याला आपलं प्राधान्य देत असतात. मात्र तुम्हाला माहितीये का थंड पाणी प्यायल्याने त्याचे अनेक अपाय होऊ शकतात. त्याचबद्दल आपण जाणून घेऊयात.

१) हृदयाचे ठोके मंदावतात

हॉटेल, कॅफेमध्ये आपण गेल्यावर आपण पाण्याची बॉटल मागतो ती थंड नसल्यास आपण वेटरला थंड पाण्याची बॉटल आणायला सांगतो. मात्र सतत थंड पाणी पिल्याने तुमच्या हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला इतरही कुरबुरी सुरु होऊ शकतात. जसं की, छातीत चमक येणे. त्यामुळे शक्य तेवढे साधे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

३) रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्याकडे लक्ष नसते. त्यामुळे श्रम करून आल्यावर आपल्याला मन फ्रेश करण्यासाठी काहीतरी करावे लागते. अनेकांना असे वाटते की पोटात पित्तामुळे होणारी आग ही थंड पाण्याने कमी होते. त्यासाठी बरेचजण अधिक थंड पाणी पितात. मात्र तसे नसून त्याचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो. आणि इम्युनिटी सिस्टिम चांगली काम करत नसेल तर अनेक आजार मागे लागतात. त्यामुळे थंड पाण्याचे सेवन करणे तुम्हाला महागात पडू शकते.

३) डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो

थंड गोष्टी खाल्यामुळे किंवा प्यायल्यामुळे थोडावेळ छान वाटते. मात्र त्यानंतर सर्दी होते आणि सर्दी झाल्यावर डोके दुखते. तसेच तुम्ही थंड पाणी जर जास्त प्रमाणात पीत असाल तर आजच याचे प्रमाण कमी करा. यामुळे तुमची डोकेदुखी वाढू शकते.

४) पचन क्रियेवर होतो परिणाम

थंड पाणी पिल्याने जशी डोकेदुखी होते तसेच यामुळे तुमच्याशी पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. थंड पाणी पिल्याने तुमची पचनक्रिया मंदावते आणि परिणामी इतर आजारांना सामोरे जावे लागते.