औरंगाबाद : औरंगाबाद येथे कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 17 मार्च पासून हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बसून जेवणास बंदी घालत फक्त पार्सलची सुविधा ठेवली. त्याचा मोठा फटका या व्यवसायिकास बसला आहे. इतर वेळी ओसंडून वाहणाऱ्या नामांकित हॉटेल भोजनालयामध्ये पहिल्या दिवशी जेमतेम पंचवीस टक्के ग्राहकांनी पार्सल नेले. पार्सलची मागणी कमी असल्याने रस्त्यावर विक्री करणारे खाद्य पदार्थाचे गाडे मात्र बंद दिसून आले.
गेल्या महिन्याभरात औरंगाबाद शहर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगल कार्यालयातील सोहळे आणि हॉटेलमधील गर्दीमुळे हे होत असल्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 4 एप्रिल पर्यंत मंगल कार्यालये बंद केली, शिवाय 27 मार्च पासून हॉटेलमध्ये बसून जेवण्यास सक्त मनाई येईल, त्या ऐवजी लोकांनी पार्सल घेऊन जावे अशी सूचना केली.
पार्सल सुविधेमुळे हॉटेल चालकांवरही परिणाम झालेला दिसून येत आहे त्याचे हॉटेलचे भाडे निघणेही कठीण आहे.
ज्या ठिकाणी रोज 100 ग्राहक येतात तेथे फक्त 40 जणच आले. बहुतांश ग्राहकांनी हॉटेलमध्ये बसून जेवण मागितले. हॉटेलमध्ये बसून जेवण्याची सोय नसल्याने अनेक जण रिकाम्या पोटी परतले.
कर्मचाऱ्यांना गमवावी लागली नोकरी
पार्सल सुविधेला अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने हॉटेल चालकाने आचारी, वाढपी व इतर कर्मचाऱ्यांना नोकरी वरून काढून टाकले आहे. यामुळे गोर-गरीब कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा