जे लोटरी तिकिट विकले न गेल्याने वैतागला होता दुकानदार; आज त्याच तिकिटाने मिळवून दिले 12 कोटी रुपये

0
37
money
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | माणूस कधी – कधी आपल्या जवळच्या कष्टी क्षणांना घेऊन खुप दुखी असतो. पण त्या दुःखी क्षणांमध्ये दटून राहिल्यानंतर कधी त्याचे नशीब उजळेल ते काय सांगता येत नाही. लॉटरी तिकीट विक्रेते शरीफउद्दीन यांचे असेच नशीब उजळले आहे. त्यांच्याच दुकानातील न विकलेल्या तिकिटाला 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यामुळे तिकीट विकले नाही म्हणून नाराज होत हार मानली नाही आणि लॉटरीच्या दिवशी कोट्याधीश झाले.

शरीफउद्दीन हे दुबई मध्ये कामाला होते. त्यानंतर त्यांनी ते काम बंद करून केरळमधील कोल्लम मधील गावात ते परत आले. परतल्यानंतर त्यांनी गावांमध्ये काम सुरू केले. लॉटरीच्या तिकिटांची विक्री करणारे छोटेसे दुकान त्यांनी सुरू केले. त्यातून तुटपुंजी कमाई त्यांना होत होती. लॉकडाऊननंतर तर परिस्थिती खूपच खालावली होती. अशा वातावरणामध्ये तिकीट पूर्ण विकत नव्हती. तिकिटे विकली नाहीत म्हणून शरिफुद्दिन नाराज होते. पण त्याच तिकिटाने त्यांची लॉटरी काढली आहे.

केरळ सरकारने ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी ही लॉटरी ठेवली होती. सोडत झाल्यानंतर बक्षिसाचे तिकीट तपासून पाहिले. आणि त्यानंतर ती रक्कम शरीफूद्दिन यांना देण्यात आली. यामध्ये 30% टॅक्स आणि 10% एजंट यांचे कमिशन असे सर्व कमी होऊन त्यांच्या हाती 7.5 कोटी रुपये रक्कम आली आहे. त्या रकमेतून एक छोटेसे घर बांधून, आपल्या डोक्यावर असणारे कर्ज फेडून, एक छोटासा व्यवसाय सुरू करून कुटुंब आनंदाने चालवण्याचा निर्णय शरिफुद्दीन यांनी घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here