पाटणला निवडणूक आयोग, मोदी सरकार, शिंदेसेना विरोधात जोरदार घोषणाबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून सोमवार (दि. 20) रोजी सकाळी कराड -चिपळूण मार्गावर झेंडा चौक पाटण येथे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तीव्र निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध करण्यात आला. पालकमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या मतदार संघात ही निदर्शने करण्यात आली.

शिवसेना ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम, जिल्हा संघटक गजानन कदम, उपजिल्हा प्रमुख रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील (नाना) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आक्रमक शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी निवडणूक आयोग, मोदी सरकार, शिंदेसेना, विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सुरेश पाटील म्हणाले, 1966 साली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्व हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष नावाचा वृक्ष लावला. त्याची फळे अनेकांनी खाल्ली. मात्र चाळीस गद्दरांनी त्या वृक्षाला नजर लावली, राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून लोकशाहीला काळींबा फासणारी घटना घडत आहे. लोकशाही राहणार कि नाही अशी सामान्य माणसाला शंका आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शांत, संयमी ,सुसंस्कृत नेतृत्व आहे. मात्र, त्यांचे नेतृत्व चाळीस गद्दारांना खटकले आणी शिवसेना फोडण्याचा कट रचला.

यावेळी शहर प्रमुख शंकरराव कुंभार, उपतालुकाप्रमुख भरत पवार, मोरणा विभाग प्रमुख उस्मान भाई शेख,संघटक संजय पवार,, संतोष साळुंखे, ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम भाऊ मगर, राजाभाऊ जगदाळे, तुकाराम देसाई , पाटण शहर प्रमुख शंकर कुंभार, शहर संघटक अभिजीत यादव,उपशहर प्रमुख सतीश कुंभार व उपविभाग प्रमुख अरविंद लोहार , अजय पवार, शामराव सावंत, राजेंद्र पाटणकर, दगडू कोळेकर, किरण शिर्के यांच्या सह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते,