व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लव्ह जिहाद प्रकरण : मुलीचा ताबा अमरावती पोलिसांकडे, साताऱ्याचे एसपी म्हणाले…

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

अमरावती जिल्ह्यातून बेपत्ता झालेली 19 वर्षीय मुलगी सातारा रेल्वे स्टेशन येथे पोलिसांनी ताब्यात घेतली होती. बुधवारी रात्री 10 वाजता संशयित मुलगी एकटीच असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने बेपत्ता मुलीला ताब्यात घेवून अधिक तपासासाठी अमरावती पोलिसांच्याकडे मुलीचा ताबा दिला. मुलीकडे कोणतीही चाैकशी करण्यात आलेली नाही. पुण्याहून ती गोव्याकडे जात होती. पुढील तपासासाठी अमरावती पोलिस सक्षम असून ते अधिक चाैकशी करतील. केवळ एक पोलिस टीम मदत करण्याचे काम करते, तेवढेच सातारा पोलिसांनी केले असल्याची माहिती सातारा पोलिस प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सातारा पोलिसांकडून मुलीला परत अमरावतीला नेण्यासाठी अमरावतीहून पोलिसांचे पथक खासगी वेशात साताऱ्यात दाखल झाले होते. यामध्ये 2 महिला पोलीस, 2 अधिकारी यांचा समावेश आहे. आज दुपारी एक वाजता या मुलीला साताऱ्यातून ताब्यात घेऊन तिला अमरावतीकडे रवाना झाले आहे. या प्रकरणावर अमरावती पोलिसांनी तपासाच कारण देत अधिक बोलणं टाळला आहे. काही तासांच्या प्रवासानंतर ही मुलगी अमरावती जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यानंतरच पुढील तपास करण्यात येणार आहे.

अमरावती “लव्ह जिहाद” काय आहे प्रकरण :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काल पोलिस ठाण्यात जावून लव्ह जिहाद प्रकरणातून मुलीला मुस्लिम तरूणाने या मुलीला नेले असल्याचे म्हणत राडा घातला होता. अनिल बोंडे यांनी या मुलीबाबत पहिल्यांदा माहिती दिली होती. त्यानंतर अमरावतील पोलिस अलर्ट झाले होते, पुण्यातून ही मुलगी निजामुद्दीन ते वास्को- द- गामा या एक्सप्रेसने गोव्याला निघाली होती. याबाबतची माहिती सातारा लोहमार्ग पोलिसांना दिली होती. रेल्वे थांबवून सातारा रेल्वे स्थानकावर या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सहा तास बेपत्ता मुलीचा पाठलाग व शोध मोहिम सातारा रेल्वे स्थानकावर थांबला. या मुलीबाबत सातारा पोलिसांकडून चाैकशी करण्यात आलेली नाही, कारण तिची अधिक चाैकशी अमरावती पोलिस करणार असल्याचे सातारा जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांनी सांगितले आहे. तर मुलगी एकटीच होती, तिच्यासोबत कोणीही नव्हते अशीही माहिती समोर आलेली आहे.