Low sodium Problems | सोडियमच्या कमतरतेमुळे गमावू शकता जीव, ‘ही’ लक्षणे दिसताच व्हा सावध

Low sodium Problems
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |मानवी रक्तामध्ये अनेक विविध घटक असतात. त्यामध्ये सोडियम देखील महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु जर रक्तातील हेच सोडियमचे प्रमाण वाढले, तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्याचप्रमाणे जर या सोडियमची कमतरता निर्माण झाली तरी देखील आरोग्यासाठी ते हानिकारक असते. या समस्येला हायपोनेट्रेमिया असे म्हणतात. त्यामुळे आपल्या शरीरातील सोडियमची पातळी ( Low sodium Problems) नेहमीच नियंत्रणात असणे खूप गरजेचे आहे.

सोडियम हा आपल्या शरीरातील असा एक घटक आहे, जो हृदय, शरीरातील पेशी, मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी गरजेचे असते. परंतु जर एखाद्याच्या शरीरात सोडियमची कमतरता असली, तर त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त पाणी पिले, तर त्यामुळे सोडियमची पातळी कमी होऊ शकते. जास्त पाणी पिले तर आपल्या शरीरातील सोडियम ( Low sodium Problems) हे पाण्यासोबत विरघळते आणि किडनीद्वारे बाहेर टाकले जाते. ही जर प्रक्रिया खूप वेळ चालू राहिली, तर शरीरात सोडियमची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे आपल्या शरीराला धोका निर्माण होतो.

सोडियमची पातळी कमी असल्याची लक्षणे |  Low sodium Problems

रक्तात कमी सोडियम असल्याने न्यूरोलॉजिकल लक्षण दिसू लागतात. सोडियमची पातळी हळूहळू कमी होते. त्यानंतर शरीरात सौम्य लक्षणे दिसतात. त्यानंतर काही दिवसांनी गंभीर आजार देखील होऊ शकतात. यामध्ये उलटी आणि मळमळ होणे, सतत डोके दुखणे, अस्वस्थता, कमी ऊर्जा पातळी आणि थकवा जाणवणे, सतत चिडचिड होणे स्नायू कमकुवत होणे या समस्या दिसतात.

सोडियमची पातळी कशी कमी होते

रक्तातील सोडियमची पातळी कमी होण्याचे मोठे कारण म्हणजे शरीरात जास्त असलेले पाणी किंवा द्रव्य पदार्थ. ही समस्या सतत असणाऱ्या एखाद्या आजारामुळे किंवा औषधामुळे देखील होऊ शकते. या संबंधाची कारणे देखील याला कारणीभूत असतात. सोडियमच्या कमतरतेमुळे हृदय मूत्रपिंड आणि यकृताला देखील समस्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये उलट्या किंवा अतिसार होणे, हार्मोनल अनियंत्रित होणे, जास्त घाम येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. परंतु या सोडियमची पातळी नियंत्रित करण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे? हे आपण जाणून घेणार आहोत.

सोडियमची पातळी संतुलित करण्याचे मार्ग |  Low sodium Problems

व्यायाम करताना काळजी घ्या

व्यायाम करताना जर तुम्हाला खूप तहान लागली, तर पाणी जर तुम्ही हे पाणी पिले नाही, तर शरीरात पुरेसे पाणी नसल्याने डीहायड्रेशनची समस्या उद्भवते. त्यामुळे पाणी पिणे गरजेचे असते.

आपल्या शरीरासाठी पाणी पिणे गरजेचे असते, परंतु ते किती पिले पाहिजे. हे देखील समजले पाहिजे तज्ञांच्या मते पुरुषांनी दररोज 3.7 लिटर पाणी पिले पाहिजेतर महिलांनी 2.7 लिटर पाणी पिले पाहिजे. जास्त पाणी पिणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकते.

सकस आहार घ्या |  Low sodium Problems

शरीरातील सोडियमची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सकस आहार घेणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे बाहेरील फास्टफूड, तेलकट पदार्थ खाणे टाळा, त्याचप्रमाणे मद्यपानाने आणि धूम्रपान करणे देखील टाळा.