हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Cylinder Price Hike – मार्च महिना सुरु झाला असून, या महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. नागरिकांना आता कमर्शियल एलपीजी गॅस खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. एलपीजी सिलेंडरच्या किंमती 6 रुपयांनी वाढल्या असून , पूर्वी हा गॅस 1797 रुपयांना मिळत होता. पण आता सणासुदीच्या काळातच याच्या किंमती वाढवल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष परिणाम सर्व क्षेत्रावर होताना दिसणार आहे. मार्च महिन्यात होळी, ईद सारखे सण आहेत. त्यातच हा बदल झाल्यामुळे सर्वांचे टेंशन वाढले आहे.
गॅस किंमती वाढल्या (LPG Cylinder Price Hike) –
घरगुती गॅसच्या किंमतीत सरकारी तेल कंपन्यांनी कोणतेही बदल केलेले आहे. पण 19 किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी गॅसच्या किंमती 6 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आधी 1797 रुपयांना मिळणारा गॅस आता 1803 रुपयांना मिळणार आहे. गॅसच्या किमतीसोबतच SEBI ने म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यांतील नॉमिनी प्रक्रियेत बदल केला आहे. गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 10 नॉमिनींचं नाव ऍड करता येणार आहे. तसेच पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यास सांगितले आहे. या तीन बदलांसोबतच विमा नियामक IREDA ने ‘विमा-ASBA’ ही सुविधा सुरू केली आहे.
या क्षेत्रावर होणार परिणाम –
मार्च महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ (LPG Cylinder Price Hike) झाल्यामुळे व्यावसायिक क्षेत्रावर परिणाम होईल, विशेषत: हॉटेल उद्योगावर. मात्र, घरगुती गॅसच्या किंमतीत बदल न झाल्याने सामान्य नागरिकांच्या महिन्याच्या बजेटवर फारसा परिणाम होणार नाही. यासोबतच, म्युच्युअल फंड, डिमॅट खात्यांच्या नॉमिनी नियमांमध्ये सुधारणा, पंजाब नॅशनल बँकेचा केवायसी अपडेट आणि विमा प्रिमियमसाठी नव्या सुविधाही महत्त्वाच्या ठरल्या आहेत.