हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन LPG Gas Cylinder Price । डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या किमती आज स्वस्त झाल्या आहेत. . महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीत कपात केली आहे. कि कपात १० रुपयांची आहे. आणि सर्वात महत्वाच म्हणजे घरगुती गॅस नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स, भोजनालये आणि केटरिंग सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.
नवीन दरानुसार आता, १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर १५८०.५० रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये १६८४ रुपये, मुंबईत १५३१ रुपये आणि चेन्नईमध्ये हाच गॅस सिलिंडर १७३९.५० रुपयांत उपलब्ध असेल. ही कपात जरी १० रुपयांची किरकोळ वाटतं असली तरी, दररोज मोठ्या प्रमाणात सिलिंडर वापरणाऱ्या व्यवसायांसाठी ही एक मोठी सवलत आहे. लग्न आणि सणांच्या काळात, जेव्हा अन्न आणि पेय व्यवसायांना सिलिंडरचा वापर वाढतो तेव्हा ₹१० ची कपात देखील मोठा फरक करत असते . LPG Gas Cylinder Price
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती जैसे थे – LPG Gas Cylinder Price
एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल झाला असला तरी दुसरीकडे तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती जैसे थे ठेवल्या आहेत. याचा अर्थ ग्राहकांना त्यांच्या घरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजीसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. देशभरातील प्रमुख शहरांमधील घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती खालीलप्रमाणे आहेत:
दिल्ली: ८५३ रुपये
मुंबई: ८५२.५० रुपये
लखनऊ: ८९०.५० रुपये
वाराणसी: ९१६.५० रुपये
अहमदाबाद: ८६० रुपये
हैदराबाद: ९०५ रुपये
पाटणा: ९५१ रुपये
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये चढ-उतार का होतात?
व्यावसायिक एलपीजी घरगुती सिलिंडरपेक्षा वेगळे सूचीबद्ध केले जाते. हे अनुदानित उत्पादन नाही, म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदल थेट त्याच्या किमतींवर परिणाम करतात. हॉटेल्स आणि अन्न उद्योग या गॅसचा वापर करतात, म्हणून कोणत्याही किंमतीतील बदलाचा त्यांच्या संपूर्ण व्यवसाय खर्चावर परिणाम होतो.




