LPG Gas Price : गॅस सिलिंडर झाला स्वस्त; वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून जनतेला गिफ्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

LPG Gas Price । आजपासून नवीन वर्ष सुरु झालं आहे. त्यामुळे सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. नववर्षाकडे सर्वच जण मोठ्या आशेने बघत आहेत. त्यातच आता जनतेसाठी मोठी खुशखबर आहे. केंद्रातील मोदी सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा किमती 1.50 ते 4.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. यापूर्वी 22 डिसेंबरलाही व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या.

एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती (LPG Gas Price) स्वस्त झाल्या असल्या तरी घरगुती गॅसच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. आजपासून व्यावसायिक गॅसच्या किमतीत 1.50 रुपयांची कपात झाल्यानंतर आता राजधानी दिल्लीत 19 किलोच्या LPG सिलेंडरची किंमत 1755.50 रुपयांवर आली आहे. आधी हाच गॅस 1757 रुपयांना विकला जात होता.

कोणत्या शहरात किती रुपये आहे दर – LPG Gas Price

IOCL च्या वेबसाइटनुसार, कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1869 रुपये आहे. मुंबईमध्ये 19 किलोचा सिलेंडर 1710 रुपयांना मिळत होता, जो आजपासून 1708.50 रुपये झाला आहे. तर चेन्नईमध्ये 1929 रुपयांऐवजी 1924.50 रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळेल. यापूर्वी 22 डिसेंबर रोजी व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत 39.50 रुपयांनी स्वस्त झाला होता. त्यात आता पुन्हा एकदा या किमती कमी झाल्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.