LPG Price Hike : LPG गॅस सिलेंडर महागला!! सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गॅस सिलेंडरच्या किमती महाग (LPG Price Hike) झाल्या आहेत. तेल विपणन पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 8.50 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मात्र हि दरवाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने आयात हॉटेल मधील जेवण महाग होण्याची शक्यता आहे. केंद्राचा अर्थसंकल्प पार पडल्यानंतरनंतर १० दिवसातच सर्वसामान्य जनेतला बसलेला हा पहिला झटका आहे.

कसे आहेत नवे दर – LPG Price Hike

IOCL च्या वेबसाइटनुसार, दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या आहेत. दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1646 रुपयांवरून 1652.50 रुपये झाली आहे. म्हणजेच दिल्लीत प्रति सिलिंडरच्या किमती 6.50 रुपयांनी वाढल्या (LPG Price Hike) आहे. तर दुसरीकडे मुंबईतही सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून 1598 रुपयांचा सिलेंडर आता 1605 रुपयांना खरेदी करावा लागणार आहे. कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली असून त्याठिकाणी 1756 रुपयांना मिळणार सिलेंडर आता 1764.5 रुपयांना खरेदी करावा लागेल. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १८०९.५० रुपयांवरून १८१७ रुपयांपर्यंत वाढली आहे.

खरं तर जुलैमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केली होती. 1 जुलै रोजी दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती, ज्यामुळे त्याची किंमत 1676 रुपयांवरून 1646 रुपयांवर आली होती. मात्र आता पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आल्याने हॉटेल चालकांच्या खिशाला झळ बसणार आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल न झाल्याने सर्वसामान्य नागरिकाला थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 803 रुपये आहे. तर मुंबईत 802.50 रुपये,कोलकात्यात 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.