LPG Price Reduced : गॅस सिलेंडर झाला स्वस्त; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे महागाईच्या विळख्यात अडकलेल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांना जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. जीवनावश्यक वस्तू असलेल्या LPG गॅस सिलेंडर ची किंमत कमी (LPG Price Reduced) झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचिऊ किंमत 31 रुपयांनी कमी केली आहे. मात्र कमी झालेली किंमत घरगुती सिलिंडरसाठी नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी आहे. त्यामुळे हॉटेलमधील जेवण आता काहीसे कमी पैशात तुम्ही खाऊ शकाल. दुसरीकडे घरगुती सिलिंडरच्या किमती मात्र जैसे थे आहेत.

कोणत्या शहरात किती रुपये ? LPG Price Reduced

नव्या दरानुसार, मुंबईत सिलिंडरची किंमत 1629 रुपयांवरून 1598 रुपयांवर आली आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १६७६ रुपयांऐवजी १६४६ रुपयांना मिळणार आहे तर कोलकाता मध्ये १७८७ रुपयांचा गॅस सिलिंडर १७५६ रुपयांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय चेन्नईमध्ये 1809.50 रुपयांना तुम्ही गॅस सिलिंडर खरेदी करू शकता. (LPG Price Reduced)

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर

दरम्यान, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 802.50 रुपये आहे. तर कोलकात्यात 829 रुपये, दिल्लीत 803 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे. 1 जून 2023 रोजी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपये होती. कंपन्यांनी 30 ऑगस्ट 2023 रोजी त्यात 200 रुपयांची मोठी कपात जाहीर केली आणि नंतर किंमत 903 रुपयांपर्यंत खाली आली. यानंतर पुन्हा 9 मार्च 2024 रोजी कंपन्यांनी त्याची किंमत 100 रुपयांनी कमी केली होती. तेव्हापासून आजपर्यंत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही.