LSG Vs MI : आज मुंबईचा सामना लखनौशी; कशी आहे पीच रिपोर्ट?

LSG Vs MI pitch report
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमिअर लीग मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजाईंट (LSG Vs MI) यांच्या हाय वोल्टेज सामना रंगणार आहे. लखनौ येथील अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियम हा सामना खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजाईंट या दोन्ही संघाने आत्तापर्यंत एकूण ३ सामने खेळले असून फक्त १ च सामना जिंकता आलाय. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघाला विजयाची अपेक्षा असेल. जो संघ जिंकेल तो पॉईंट टेबलवर वरच्या स्थानी जाईल… जो हरेल त्याची पुढील वाटचाल बिकट असेल. लखनौ सुपरजाईंट विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यासाठी पीच रिपोर्ट कस असेल यावर एकदा नजर टाकूया….

इकाना स्टेडियमच्या पीच रिपोर्टबद्दल सांगायच झाल्यास, काळ्या मातीचे हे पीच आहे.. येथे खेळलेल्या गेल्या ६ पैकी ५ सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत, आजही दोन्ही संघ (LSG Vs MI) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यावर आपला भर देतील. या मैदानावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १५ सामन्यांपैकी ९ सामने नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने जिंकले आहेत. रात्री दव पडण्याची आशा फारच कमी दिसते. त्यामुळे नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला फार त्रास होणार नाही. मैदान मोठं असल्याने चौकार षटकार मारणं थोडं कठीण आहे… त्यासाठी फलंदाजांना आणखी मेहनत घ्यावी लागेल. खास करून सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये दोन्ही संघाला जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील.

लखनौ विरुद्ध मुंबई हेड टू हेड रेकॉर्ड– LSG Vs MI

एकूण खेळलेले सामने – ६

लखनौचा विजय – ५ वेळा
मुंबई जिंकली- १ वेळा
अनिर्णीत- ०
इकाना स्टेडियमवर लखनौने २-२ असा विजय मिळवला.
इकाना स्टेडियमवर मुंबई एकही मॅच जिंकलेली नाही,….

मुंबई इंडियन्स साठी रोहित शर्माचा खराब फॉर्म हि चिंतेची बाब आहे . मुंबईचा हा माजी कर्णधार धावा काढताना चाचपडताना दिसतोय.. त्याने आत्तापर्यंत ३ सामन्यात फक्त २५ धावा काढल्या आहेत. मुंबईला विजय मिळवायचा असेल तर रोहितला आपला फॉर्म दाखवावा लागेल आणि मोठी खेळी खेळावी लागेल. दुसरीकडे लखनौसाठी कर्णधार रिषभ पंतचा फॉर्म डोकेदुखी ठरतेय. आत्तापर्यंत ३ सामन्यात फक्त १७ धावा काढल्या आहेत. लखनौ साठी आनंदाची बातमी म्हणजे संघाचा पेस अटॅक आता खूपच सुधारलेला दिसतोय. अवेश खान हैद्राबाद विरुद्ध संघात सामील झाला आणि आकाश दीप आजच्या सामन्यात खेळू शकतो.