रोहित शर्मासाठी लखनौने 50 कोटी ठेवलेत? मालकांनी सगळंच सांगून टाकलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2025 साठी खेळाडूंचा एक मेगा लिलाव होऊ शकतो. अशावेळी प्रत्येक संघ काही खेळाडूंना संघात कायम ठेवेल आणि काही खेळाडूंना रिलीज करेल. रिलीज करण्यात आलेले खेळाडू पुन्हा एकदा लिलावात दिसतील. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांत अशा बातम्या पसरल्या होत्या कि मुंबई इंडियन्सने जर रोहित शर्माला (Rohit Sharma) रिलीज केलं आणि तो मेगा लिलावात उतरला तर लखनौ सुपरजाईंटने (Lucknow Super Giant) रोहितला खरेदी करण्यासाठी तब्बल ५० कोटींची तयारी ठेवली आहे. मात्र या बातमीत कितपत तथ्य आहे याबाबत खुद्द फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयंका यांनी समोर आणलं आहे.

स्पोर्ट्स टाकवरील एका मुलाखतीदरम्यान संजीव गोयंका यांना विचारण्यात आले कि, लखनौ सुपरजाईंटने रोहित शर्मासाठी 50 कोटी रुपये बाजूला ठेवल्याच्या अफवा पसरत आहेत. ते खरे आहे का? त्यावर उत्तर देताना संजीव गोयंका म्हणाले, ‘मला एक गोष्ट सांगा, रोहित शर्मा लिलावात येत आहे की नाही हे तुम्हाला किंवा कोणाला माहीत आहे का? हे सर्व तर्क- वितर्क लावण्यात येत आहेत. मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार की नाही, तो लिलावात येतोय की नाही, याबाबत कोणालाच माहिती नाही. तो आला तरी तुम्ही तुमच्या पॉकेट मधील५० टक्के रक्कम एका खेळाडूवर कशी वापरणार?असा सवाल सुद्धा गोयंका यांनी केला.

यानंतर संजीव गोयंका याना असेही विचारण्यात कि रोहित शर्मा तुमच्या अपेक्षित खेळाडूंच्या यादीत आहे का? तयावे ते म्हणाले, “प्रत्येकाची एक अपेक्षित खेळाडूंची यादी असते. तुम्हाला संघात सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम कर्णधार हवा असतो. जे तुम्हाला मिळालं आहे आणि जे उपलब्ध आहे त्यातून निवड करायची असते. मला कोणत्याही खेळाडूची अपेक्षा असू शकते. पण फ्रँचाईजीचं मतंही महत्त्वाचं असतं. तुम्हाला प्रत्येकजण मिळत नाही,” असं गोयंका यांनी म्हंटल.

दरम्यान, रोहित शर्मा हा आयपीएल मधील दिग्गज खेळाडू आहे. २००८ पासून म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रोहित खेळतोय. सुरुवातीला तो डेक्कन चार्जर्स कडून खेळत होता, त्यानंतर २०११ मध्ये तो मुंबईच्या गोटात आला. रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स हे नातं अतिशय घट्ट जमलं. वानखेडे स्टेडियम फक्त रोहितची फटकेबाजी पाहायला फुल्ल भरते. रोहित शर्माने मुंबईला तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली आहे. यादरम्यान त्याने अनेक नवीन खेळाडू घडवले. यापूर्वी आयपीएल 2022 पूर्वी मुंबई संघाने रोहितला 16 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. पण गेल्या हंगामात मुंबईने हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेतलं आणि थेट कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यात काही ठीक नसल्याच्या बातम्या नेहमीच सुरु असतात.