Luna 25 Crashed : रशियाचे स्वप्न भंगले!! Luna 25 चांद्रयान कोसळले 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाचे लुना २५ (Luna 25 Crashed) हे चांद्रयान हे चंद्रावर लँडिंग होण्याआधीच क्रॅश झालं आहे. त्यामुळे भारताच्या आधी चंद्रावर पोचण्याचे रशियाचे स्वप्न भंगले आहे. कालच लुना-25 मध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. अखेर आज हे यान कोसळले असल्याची बातमी समोर आली आहे. रशियाची स्पेस एजन्सी रॉस्कॉस्मॉसने याबाबतची माहिती दिली.

तांत्रिक बिघाडामुळे यान कोसळले- Luna 25 Crashed

खरं तर सोमवारी (21 ऑगस्ट) Luna 25  हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार होतं. मात्र काल म्हणजेच शनिवारी लुना-25 मध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता आणि यान भरकटले होते. संशोधकांनी या यानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही.  त्यानंतर आज अधिकृतपणे रशियाने हे यान क्रॅश झाल्याची माहिती दिली आहे. रशियाचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न यामुळे भंग झालं आहे. मात्र यामुळे भारताला मात्र संधी निर्माण झाली आहे. भारताचे चांद्रयान ३ हे सध्या यशस्वीपणे पुढे मार्गक्रमण झालं असून 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी चंद्रावर उतरेल.

दरम्यान, 1976 साली पार पडलेल्या Luna 24 या मोहीमेनंतर तब्बल 47 वर्षांनी रशियाने ही चांद्रमोहीम राबवली होती. Luna 25 हे यान 11 ऑगस्ट रोजी पहाटे 4.40 वाजता रशियाच्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम येथून लाँच करण्यात आलं होते. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे यान खूपच स्पीडने चंद्राच्या दिशेने गेलं होते. Luna 25 ने चंद्राचा कधीही न दिसणाऱ्या भागाचा फोटो सुद्धा काढला होता. परंतु अंतिम टप्प्यात अचानकच या यानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दुर्दैवाने हे यान कोसळले आणि चंद्रावर क्रॅश झालं. लूना-25 आणि चांद्रयान-3 चा चंद्रावर उतरण्याची वेळ जवळपास सारखीच असणार होती. लुना काही तासांपूर्वीच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते, परंतु आता ते क्रॅश (Luna 25 Crashed) झाल्याने रशियाचे स्वप्न भंगले आहे.