देशभरात पूर्णपणे स्वदेशी असलेल्या वंदे भारत ट्रेनचा विस्तार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अशातच आता वंदे भारत च्या फॅन्स साठी आनंदाची बातमी आहे. कारण आता वंदे भारत एक्सप्रेस श्रीनगर पर्यन्त धावणार आहे. याचा फायदा पर्यटकांना होणार आहे. चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती
भारतीय रेल्वेने काश्मीर खोऱ्यात ट्रेन चालवण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. श्रीनगर रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे धावण्याची रेल्वेची योजना आहे. वंदे भारत एक्स्प्रेस श्रीनगरपर्यंत चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.म्हणजेच वंदे भारत ही पहिली ट्रेन असेल, जी श्रीनगरपर्यंत धावेल. याशिवाय श्रीनगरला इतर कोणत्या गाड्या धावू शकतात? भारतीय रेल्वेनेही त्याचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू केले आहे. ज्या गाड्यांचा विस्तार केला जाणार आहे त्या सध्या फक्त जम्मू आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकापर्यंत जात आहेत. रेल्वेची योजना निश्चित होताच वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांनाही श्रीनगरला जाता येणार आहे. याचा फायदा पर्यटनाला होणार आहे.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 गाड्यांचा विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. आता या गाड्या लवकरच श्रीनगरला पोहोचतील. याचा फायदा पर्यटकांनाही होणार आहे.
कोणत्या गाड्यांचा समावेश
यामध्ये तिरुनेलवेली ते माता वैष्णो देवी कटरा ही ट्रेन क्रमांक 16787-88, नवी दिल्ली ते जम्मू तावी ट्रेन क्रमांक 12425-26, कोटा ते माता वैष्णो देवी कटरा ही ट्रेन क्रमांक 19803-04, ट्रेन क्र. 16317-18 कन्या कुमारी ते माता वैष्णो देवी कटरा, ट्रेन क्र. 12445-46 नवी दिल्ली ते माता वैष्णो देवी कटरा, ट्रेन क्र. 12331-32 हावडा ते जम्मू तवी, ट्रेन क्र. 11449-50 जबलपूर ते माता वैष्णो देवी कटरा, ट्रेन क्र. 16031 -32 चेन्नई सेंट्रल ते माता वैष्णोदेवी कटरा इत्यादी गाड्यांचा समावेश आहे.
21 सप्टेंबर रोजी सुटली होती विशेष गाडी
याआधीही भारतीय रेल्वेने माता वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांसाठी सप्टेंबरमध्ये विशेष ट्रेन चालवली होती. स्वस्त तिकिटांवर जेवण, वाहतूक आणि हॉटेलचे भाडे यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. हे IRCTC ने बजेट फ्रेंडली प्लॅन अंतर्गत आणले आहे. ज्यामध्ये एक रात्र आणि दोन दिवसांचा समावेश होता. ही ट्रेन 21 सप्टेंबर रोजी कटरा येथून दिल्लीला रवाना झाली होती. कटरा येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश होता. ज्यामध्ये एका व्यक्तीसाठी ९१४५ रुपये तिकीट ठेवण्यात आले होते.