Made In India Bullet Train : भारतात बनणार Made In India बुलेट ट्रेन; देशाच्या ‘या’ भागांत धावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता भारत स्वदेशी बुलेट ट्रेन (Made In India Bullet Train) बनवण्याच्या तयारीत आहे. देशाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्वेकडील भागात ही देशी बुलेट ट्रेन धावेल. सध्या या ट्रेनच्या डिझाईनचे काम सुरु असून लवकरच ती भारतीयांच्या सेवेत येईल. सध्या देशात मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आलं असून २०२६ पर्यंत ती रुळावर धावेल. त्यानंतर मेड इन इंडिया बुलेट ट्रेन भारत सरकार तयार करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच सांगितलं होते कि देशाच्या कानाकोपऱ्यात आणखी काही बुलेट ट्रेन धावतील.

ताशी 250 किमी धावणार? Made In India Bullet Train

इकॉनॉमिक टाईम्सच्या एका वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, देशात स्वदेशी बुलेट ट्रेनची तयारी सुरू झाली आहे. ही बुलेट ट्रेन ताशी 250 किमीचा वेग ओलांडण्यास सक्षम आहे. या बुलेट ट्रेनचे डबे चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) द्वारे डिझाइन केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या देशी बुलेट ट्रेन मध्ये देशांतर्गत तंत्रज्ञान आणि उत्पादनाचा समावेश केला जाणार आहे. एकदा का बुलेट ट्रेन रुळावर धावली कि ती देशातील सर्वात जलद ट्रेन ठरेल. ही स्वदेशी बुलेट ट्रेन देशाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व कॉरिडॉरवर धावणार आहे. या ट्रेनमुळे भारतातील वाहतूक व्यवस्था आणखी सुधारेल तसेच देशाच्या इकॉनॉमीवर सुद्धा त्याचा परिणाम पाहायला मिळेल.

दरम्यान, सध्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. हि बुलेट ट्रेन 320 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम असेल. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी भारताला आर्थिक मदत करत आहे. तर नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या एकूण संपूर्ण प्रकल्पावर देखरेख ठेवत आहे. भारत सरकारने गेल्या काही वर्षापासून रेल्वे विभागाचा कायापालट केला आहे. वंदे भारत, वंदे भारत साधारण ट्रेन, अमृत भारत ट्रेन अशा एकामागून एक नवीन ट्रेन लाँच करत प्रवाशांची चांगली सोय करून दिली आहे. त्यातच आता बुलेट ट्रेनची (Made In India Bullet Train) भर पडणार असून देशाच्या विकासाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे.