सरकारची मोठी घोषणा : आता ज्येष्ठ नागरिकांनाही करता येणार विमानातून मोफत प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळा असोल कि उन्हाळा प्रवास करणे सर्वांनाच आवडते. रेल्वे, बस आणि हवाई जहाज याद्वारे तर कुणी स्वतःच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडीतून प्रवास करतो. प्रवास कर्यात जेष्ठ नागरिकांसाठीही अनेक सवलती दिल्या जातात. एसटीतून त्यांना मोफत प्रवास दिला जातो. मात्र, आता जेष्ठ नागरिकांना विमानातूनही मोफत प्रवास करता येणार आहे.

राज्य तसेच केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवांमध्ये सूट दिली जाते. रे याबाबतची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे आता जेष्ठ नागरिकांदेखील विमानातून मोफत प्रवास करता येणार आहे. त्यांना विमान प्रवास करताना कोणत्याही स्वरूपाचे पैसे देता येणार नाही.

भिंड येथील संत रविदास यांच्या जयंती आणि चंबळ विभागाच्या विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही घोषणा केली. यावेळी चौहान म्हणाले की, मध्यप्रदेश राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना पुढील महिन्यापासून विमानाने तीर्थयात्रेला जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या तीर्थक्षेत्र योजनेत संत रविदासांच्या जन्मस्थानासह अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. या तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक सरकारी खर्चाने तीर्थक्षेत्री जाऊ शकतील, असे मुख्यमंत्री सिंह यांनी म्हंटले आहे.