व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Maggi Price at Airport : मॅगीची विमानतळावरील किंमत पाहून येईल चक्कर!

Maggi Price at Airport : सोशल मिडीयावर अनेक किरकोर गोष्टी ही चर्चेचा विषय ठरतात. आता याच सोशल मिडीयावर आपल्या सर्वांना आवडणारी मॅगी चर्चेचा विषय बनली आहे. एका महिलेला झटपट बनणारी ही मसाला मॅगी एअरपोर्टवर तब्बल १९३ रुपयांना बसली आहे. त्यामुळे या मॅगीमध्ये असे काय खास आहे असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. मात्र एअरपोर्टवर प्रत्येकच गोष्ट महाग मिळत असल्यामुळे या महिलेला मॅगी देखील महागच बसली आहे.

यासंदर्भात तिने केलेल्या एका ट्विटमुळे मॅगी प्रकरण चर्चेत आले आहे. ट्विटरवर सेजल सुद या महिलेने या मॅगीसह त्याच्या बिलाचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे की, मी नुकतेच एअरपोर्टवर १९३ रुपयांना मॅगी खरेदी केली. मला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही, कोणी मॅगी एवढ्या जास्त किंमतीत का विकेल? असा प्रश्न तिने विचारला आहे.

तिने शेअर केलेल्या बिलामध्ये तिला दोन मिनिटात बनवून मिळणाऱ्या मसाला मॅगीची किंमत १९३ रुपये दिली आहे. तसेच त्यावर ९.२० रुपये जीएसटी आकारण्यात आला आहे. यामुळेच मॅगीचे बिल एवढे झाले आहे. आता पर्यंत तिच्या या ट्विटला ९ लाख ७८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर ३ हजाराहून लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या घडलेल्या प्रकारावर दिल्या आहेत.

नेटकऱ्यांना मॅगीची किमत न पचल्यामुळे त्यांनी एअरपोर्टवरील महागाईवर आपला संताप व्यक्त केला आहे. सध्या या महिलेने केलेली पोस्ट सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे. आपल्याकडे साधारण मॅगीच्या एका लहान पुड्याची किंमत १२ रुपये आहे. अनेक कॅफे आणि हॉटेल्समध्ये देखील मॅगी एवढी महाग देण्यात येत नाही. मात्र एअरपोर्टवरील या मॅगीची किंमत बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

आजवर आपण एअरपोर्टवरील मिळणाऱ्या महाग गोष्टींविषयी फ्कत ऐकतच आलो आहे. परंतु आज एअपोर्टवर मॅगी देखील तितकीच महाग मिळू शकते हे चांगलेच लक्षात आले आहे. यामुळे एका सामान्य माणसाला एअरपोर्टवरील काहीच परवडू शकत नाही हे सिध्द झाले आहे. मुख्य म्हणजे, यामुळे एअरपोर्टवर माणसांना लुबाडण्याचे काम केले जाते असा आरोप अनेकांकडून लावण्यात आला आहे.