Maha Agro Mart App | शेतकऱ्यांच्या शेतमालाची होणार ऑनलाईन विक्री, ‘हे’ ॲप आताच डाउनलोड करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maha Agro Mart App | आतापर्यंत शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेला शेतमाल त्यांना एखाद्या बाजारात किंवा मार्केटमध्ये विकायला घेऊन जायला लागत होता. परंतु आता शेतकऱ्याच्या या शेतमालाला एक डिजिटल प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. त्यामुळे आता शेतमाल विकणे त्यांच्यासाठी खूप सोपे झालेले आहे. महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी महा ऍग्रो (Maha Agro Mart App )या ॲपचे अनावरण केलेले आहे. त्याचप्रमाणे या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू आहेत. त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासन आणि भारतीय पोस्ट यांच्या करारावर सही देखील केलेली आहे.

या ॲपच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, आपल्या देशात मोबाईल, इंटरनेट तसेच ऑनलाइन पेमेंट या सगळ्यांची क्रांती झालेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्याचा फायदा आता ई-कॉमर्स क्षेत्राला मोठ्या प्रमाणात झालेला दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता भविष्यात भारतातील ई-कॉमर्स सेवा 250 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

पुढे ते म्हणाले की, या डिजिटल प्लॅटफॉर्मचा (Maha Agro Mart App ) फायदा कृषी क्षेत्राला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मोबाईल ॲप आणि वेब प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा सरकारचा आजपासूनच प्रयत्न होता. पारंपारिक शेती आणि आधुनिक शेती यांचा मेळ घालता येणार आहे.

फायदा कृषी क्षेत्राला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मोबाईल ॲप आणि वेब प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा सरकारचा आजपासूनच प्रयत्न होता. पारंपारिक शेती आणि आधुनिक शेती यांचा मेळ घालता येणार आहे.

या नव्या महा ॲग्रो ॲपद्वारे (Maha Agro Mart App) आता शेतकरी स्वयंसहायता गट, लहान मोठे व्यवसायिक, शेतकरी बचत गट, स्टार्टअप त्याचप्रमाणे शेतीशी निगडित असणाऱ्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री करता येणार आहे. त्यामुळे ही एक आता नव्या पर्वाची सुरुवात झालेली आहे.

या ॲपद्वारे जे ग्राहक वस्तू खरेदी करतील त्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आता भारतीय पोस्ट खाते आणि फर्स्ट अँड फास्ट लॉजिस्टिक हे करणार आहेत. त्यामुळे पोस्ट खात्यावरील विश्वास आता आणखी सार्थ ठरेल असे देखील धनंजय मुंडे यांनी सांगितले.

ॲप वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयोगी | Maha Agro Mart App

यामाहा ॲग्रो ॲपच्या अनावरणाच्या सोहळ्यात 358 उत्पादकांची 1370 उत्पादने या नवीन प्लॅटफॉर्मवर आता उपलब्ध होणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना हवामान खात्याची माहिती देखील समजणार आहे. तसेच विविध प्रकारच्या कृषी मालाचे रोजचे भाव या पोर्टलवर उपलब्ध करून देणार आहेत.

हे ॲप डाऊनलोड कसे करायचे

  • हे ॲप आपल्या मोबालच्या प्ले स्टोअरमध्ये महा ऍग्रो मार्ट (Maga Agro Mart App) या नावाने आहे.
  • या ॲपवर तुम्हाला फ्लिपकार्ट ॲमेझॉन तसेच इतर ॲप सारखे उत्पादन खरेदी करता येणार आहे.
  • त्याचप्रमाणे येथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्याचा ऑप्शन देखील उपलब्ध असणार आहे.

ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा