Mahada Lottery : म्हाडाच्या घरांची किंमत 25 टक्क्यांपर्यंत कमी होणार ; राज्य सरकारची महत्वपूर्ण घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahada Lottery : सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी घरं उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजे ‘म्हाडा’ अशी म्हाडाची ख्याती आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मुंबईसाठी घोषित करण्यात आलेल्या सोडतीमधील घरांच्या किमती बघता तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. या घरांची किंमत जास्त असल्यामुळे ग्राहकांनी म्हाडाच्या घरांकडे पाठ फिरवली होती. त्यामुळेच एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. म्हाडाच्या घराच्या किमतींमध्ये दहा ते पंचवीस टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात (Mahada Lottery) आला असून याबाबत मंत्री अतुल असावे यांनी मुंबई येथे घोषणा केली.

याबाबत माहिती देताना मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, म्हाडाच्या घराच्या किंमती या 10 ते २५ टक्क्यांनी कमी होतील. विविध पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. मुंबई म्हाडा लॉटरी 2024 मध्ये देखील याचा लाभ मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे घर घेऊ इच्छिणाऱ्या गृह खरेदीदारांना याचा मोठा (Mahada Lottery) फायदा होणार आहे.

कोणत्या घरांच्या किमती होणार कमी? (Mahada Lottery)

मिळालेल्या माहितीनुसार 33 (5) आणि 33 (७) अंतर्गत करण्यात आलेल्या योजनेतील घरं विकासकांकडून म्हाडाला मिळालेली आहेत. या घरांच्या किमती कमी होणार आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी किमती दहा टक्के कमी होणार आहेत तर मध्यम गटासाठी पंधरा टक्के रक्कम कमी होणाऱ आहेत तर अल्पगटासाठी 20% रक्कम कमी होणार आहे. शिवाय अत्यल्प गटासाठी असलेल्या घरांच्या किमतीमध्ये 25 टक्क्यांनी घसरण (Mahada Lottery) होणार आहे.