पंकजा मुडेंना भाजपमध्ये त्रास झाल्यास, मीच त्यांना…..; शेवटी भाऊच आला मदतीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या पंकजा मुंडे या गेल्या काही भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सतत सुरु असतात. मात्र वेळोवेळी त्यांनी या गोष्टींचा इन्कार केला आहे. आणि भाजपमध्ये राहणार असल्याचे अनेकदा स्पष्ट केलं आहे. परंतु पंकजा मुंडे यांचे मानलेले बंधू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या एका विधानाने पुन्हा एकदा पंकजा भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये जास्त त्रास झाल्यास त्यांना मी साडी चोळी घेऊन घ्यायला जाईल, असं जानकर म्हणाले.

अहमदनगर दौऱ्यावर असताना जानकर म्हणाले, पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्या माझ्या बहिण आहेत. त्या राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर बहीण म्हणून काय ती जबाबदारी मी देईल. परंतु सध्या तरी दिल्या घरी सुखी राहा एवढेच मी पंकजा मुंडे यांना सांगले. मात्र ज्यावेळी त्यांना भाजपमध्ये जास्त त्रास होईल ते तेव्हा मी माझ्या बहिणीला साडी चोळी घेऊन घ्यायला जाईल असं महादेव जानकर यांनी म्हंटल. जानकर यांच्या या विधानाने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

यावेळी महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खरं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मी भाजप युतीबरोबर गेलो होतो. मात्र भाजपचे आत्ताचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा हुशार आहेत. त्यांना वाटत असेल आमची गरज नाही. त्यामुळे त्यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही, असा इशाराही जानकर यांनी भाजपला दिला. तसेच आगामी २०२४ लोकसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार आहे. आम्ही लोकसभेच्या 543 जागा लढवणार असून चार राज्यांमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली आहे असेही त्यांनी सांगितलं