Mahalaxmi Express Fire : कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये तांत्रिक बिघाडातील घर्षणामुळे आग लागण्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र रेल्वेतील प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून रेल्वेतील चेन ओढली आणि रेल्वे तात्काळ थांबली. ही घटना हातकलंगले ते रुकडी दरम्यानच्या पंचगंगा पुलाच्या नजीक घडली. अचानक रेल्वेच्या एसी एम 2 मध्ये आग लागल्यामुळे एकच खळबळ (Mahalaxmi Express Fire) उडाली.
याबाबत प्रवाशांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी क्रमांक 17 4 12 ला हातकणंगले ते रुकडी दरम्यान पंचगंगा पुलाच्या जवळ येताना अचानक आग लागली. त्यामुळे गाडीमध्ये एकच खळबळ उडाली मात्र प्रवाशांनी प्रसंगावधन दाखवून गाडीची चेन ओढली यानंतर पाहिले असता एसी एम दोन या बोगीच्या चाकाला घर्षणामुळे (Mahalaxmi Express Fire) आग लागल्याचे निदर्शनास आले. गाडीतील आग रोधक सिलेंडरने ही आग विझवून तात्काळ ही गाडी मिरजेकडे रवाना झाली आणि मिरजे मध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या बोगीची पाहणी करून गाडी सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर तब्बल एका तासाने ही गाडी मुंबईकडे रवाना झाली.
अन अनर्थ टळला (Mahalaxmi Express Fire)
कोल्हापूर स्थानकातून गाडी सुटल्यानंतर वळीवडे स्थानकाच्या काही किलोमीटरवर ही घटना घडल्यावर प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली. प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या आणि सुरक्षित स्थळी जाऊन प्रवासी थांबले. गाडी सुरक्षित असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा गाड्यांमध्ये चढून प्रवाशांनी प्रवास केला. दरम्यान या गाडीचे इंजिन नदी शेजारी थांबल्यामुळे अनर्थ ठरला. साखळी ओढल्यानंतर गाडी नदीवर थांबली असती तर प्रवाशांनी थेट नदीमध्ये उड्या घेतल्यास आणि मोठी दुर्घटना घडली असती.