छ. संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची समाधी साताऱ्यातील ‘या’ गावात सापडली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
29 वर्षे औरंगजेबाच्या कारावासात असणाऱ्या थोर पराक्रमी स्त्री म्हणून इतिहासाच्या पानामध्ये नोंद असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची समाधी सातारा शहरालगत असणाऱ्या माहुली या गावात असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. या ठिकाणी दगडी वृंदावन आणि घुमटी असल्याचे समोर आले आहे.

महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध घेण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू होते. अखेर माहुली या गावामध्ये येसूबाई यांची समाधी असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. महाराणी येसूबाई यांच्या समाधी बाबत गेली अनेक वर्षे साशंकता व्यक्त केली जात होती अखेर आज इतिहासाच्या पासून दूर असणाऱ्या महाराणी येसूबाई यांची समाधी समोर आल्याने मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला जात आहे.

या ठिकाणी इतिहास अभ्यासक जिज्ञासा विचारमंच आणि माहराणी येसूबाई फाउंडेशन च्या अभ्यासकांशी बातचीत केली असता त्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे. येसूबाई यांची समाधी आत्तापर्यंत अज्ञात होती. अनेक इतिहासकानी यासाठी परिश्रम घेतले होते. गेल्या 6-7 वर्षांपासून जिज्ञासा संस्था या समाधीच्या स्थाननिषिदा साठी प्रयत्न करत होती. 6 वर्षांपूर्वी काही कागदपत्रात या समाधीचा उल्लेख सापडला. येथील हरिनारायण मठात महाराणी ताराबाईंनी 1756 साली एक दानपत्र लिहिले होते. त्या दानपत्राच्या चतुरसीमित या समाधीचा उल्लेख पहिल्यांदा सापडला. परंतु त्यावेळचे नकाशे आणि इतर काही गोष्टी मिळत नव्हत्या. त्यामुळे याला बराच कालावधी लोटला. नुकतंच आम्हाला हरिनारायण मंठासंदर्भात नकाशा मिळाला ज्यामुळे आम्ही या समाधीच्या जागेचा स्थाननिषिदा करू शकलो अशी प्रतिक्रिया जिज्ञासा विचारमंच आणि माहराणी येसूबाई फाउंडेशन च्या अभ्यासकांनी दिली.