महाराष्ट्र 10वी-12वी निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार

SSC-HSC Result
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या विद्यार्थांनी 10वी अन 12वीच्या परीक्षा दिल्या होत्या , त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 21 लाख विद्यार्थ्यांच्या दहावी अन बारावीच्या परीक्षा निकालाबाबत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. दोन्ही परीक्षांचे निकाल मे महिन्यात जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षा निकालाची तारीख मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाईल. यानंतर, दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 15 मे पर्यंत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश –

विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी बोर्डाने यंदाच्या वर्षी परीक्षा लवकर घेतल्या आणि निकाल लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आणि पुरवणी परीक्षेसाठी अधिक वेळ मिळेल. यापूर्वी, निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील वेळेवर काम करण्यास अडचणी आल्या होत्या.

विद्यार्थ्यांना निकाल या ठिकाणी पाहता येणार –

विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचे निकाल खालील वेबसाइट्सवर पाहता येणार आहेत –

mahahsscboard.in

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in

sscresult.mkcl.org

hsc.mahresults.org.in

विद्यार्थ्यांना लवकर निकाल मिळाल्यामुळे, शैक्षणिक पुढील योजना आणि प्रवेश प्रक्रियेच्या दृष्टीने मदत होईल. लवकरच निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली जाणार आहे.