Maharashtra Assembly Elections 2024 | नामदेव जाधव यांची राजकारणात एंट्री; स्थापन केला स्वतःचा नवीन पक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Assembly Elections 2024 | महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर केलेल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी देखील होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. अनेक उमेदवारांची घोषणा देखील झालेली आहे. महाराष्ट्रात आणखी एका नवीन पक्षाची देखील स्थापना झालेली आहे. शिवाजीचा मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचे लेखक नामदेव जाधव यांनी स्वतःचा एक पक्ष काढलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केलेली आहे. त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकीत नक्की काय हालचाली होणार आहे? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहेत.

लेखक नामदेव जाधव यांची ओळख नेहमीच एक वादग्रस्त लेखक म्हणून राहिलेली आहे. आणि त्यांनी आता राजकारणात प्रवेश करून स्वतःचा एक नवीन पक्ष स्थापन केलेला आहे. जर कोणत्याही उमेदवाराला विधानसभा निवडणूक लढाईची असेल आणि त्यांना जर कोणत्याही पक्षातून उमेदवारी देत नसेल अशा लोकांसाठी हा पक्ष एक चांगला पर्याय असणार आहे. याबाबतची माहिती लेखक नामदेव जाधव यांनी दिलेली आहे.

या आधीची लोकसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2024) नामदेव जाधव हे बारामतीच्या मतदार संघातून लढले होते. नामदेव जाधव यांनी स्थापन केलेल्या या पक्षाचे नाव छत्रपती शासन असे आहे. मागेल त्याला उमेदवारी असं धोरण त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी घोषित केलेले आहे. ते स्वतःला राजमाता जिजाऊ यांचे वंशज म्हणतात. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे अनेक लोकांनी आक्षेप देखील दर्शवला होता. तसेच त्यांच्यावर शाई फेक देखील करण्यात आलेली होती. या आधी नामदेव जाधव यांना पुण्यामध्ये त्यांच्या तोंडाला काळं देखील फासण्यात आलेलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाकडून हे आंदोलन करण्यात आलेले होते. कारण त्यांनी शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आणि त्यामुळे त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आले होत3. परंतु आता यावर्षी ते विधानसभा निवडणूक स्वतःचा एक पक्ष घेऊन उतरलेले आहेत. आता त्यांच्या पक्षात नक्की कोण कोण जाईल,म आणि यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीची चक्र कशाप्रकारे फिरणार आहेत? हे पाहणे महत्त्वाचे आहे.